अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना विरोध होताना दिसत आहे. यापैकीच एक प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला चित्रपट म्हणजे ‘हमारे बारह’. या चित्रपटाचं पोस्टर सादर केल्यापासूनच यावरून वाद होतायत. आता अनेक मुस्लीम संघटना आणि राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर बंदी घलण्याची मागणी केली आहे. आव्हाड यांनी मंगळवारी (२७ मे) रात्री पत्रकार परिषद घेऊन त्यांची मागणी मांडली. एका ठराविक समाजाला बदनाम करण्यासाठी हा चित्रपट बनवला असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जी कोणी व्यक्ती मला एका मुस्लीम व्यक्तीच्या घरात त्याची १० मुलं दाखवेल त्या व्यक्तीला मी ११ लाख रुपयांचं बक्षीस देईन. मुळात आता कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलं नाहीत. असं चित्र कुठेही नसताना लोकांमध्ये गैरसमज का निर्माण केला जातोय. कोणत्या धर्माच्या धर्मग्रंथात किंवा धार्मिक पुस्तकात असं लिहिलेलं नाही. हिंदू, मुस्लिम, शीख किंवा बौद्ध धर्मांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये असं कुठेही काहीही लिहिलेलं नाही. कोणी किती मुलं जन्माला घालावी हा त्या पती-पत्नीचा प्रश्न आहे. एखाद्या महिलेला अधिक मुलं नको असतील तर ती नकार देऊ शकते. तिला नकार देण्याचा अधिकार आहे.

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…

शरद पवार गटातील आमदार म्हणाले, मुस्लिमांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिलं आहे की, पतीने पत्नीला विचारल्याशिवाय काहीच करू नये. हे सगळं इसवी सन ६२२ मध्ये लिहिलं आहे. त्यामधील एकही ओळ बदललेली नाही. मात्र काही लोक देवाच्या पुस्तकाची मोडतोड करू पाहत आहेत. कुराण हे देवाचं पुस्तक असून त्यातली माहिती खोट्या पद्धतीने मांडून चित्रपट काढून या लोकांना काय आनंद मिळतो हे मला कळत नाही. हे सगळं चालू असताना सेन्सॉर बोर्ड काय करतं, ते कोणाच्या हाताखाली काम करतं हे देवालाच ठावूक. त्यामुळे मला वाटतं की, सेन्सॉरने थोडं जबाबदारीने काम करायला हवं. मी तर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा >> “गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत!

जितेंद्र आव्हाड म्हणाले, या चित्रपटात दावत-ए-इस्लामी या संस्थेचा बॅनर वापरण्यात आला आहे. भारतभर या संस्थेच्या शाखा आहेत. परंतु, हा चित्रपट बनवणाऱ्या लोकांनी चित्रपटात त्यांचा बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. सेन्सॉरने त्यावर चित्रपटकर्त्यांना प्रश्न विचारायला हवा होता. मी त्या संस्थेतील लोकांशी बोललो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, चित्रपटकर्ते किंवा सेन्सॉरने त्यांच्याशी संपर्क साधला नव्हता. आमची परवानगी न घेता त्यांनी चित्रपटात आमचा बॅनर वापरला आहे. त्यामुळे मी पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मुळात देशात इतके सगळे मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत आणि हे लोक नवे प्रश्न उभे करत आहेत.