छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत, असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं. या विधानावरून राज्यपालांवर सडकून टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला आहे. “थोड्या दिवसांपूर्वी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की, हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नकोत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत, अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचकं गुंडाळ,” असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

हेही वाचा : राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “शिवसेना फोडली, इथे…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “राज्यपालांना हटवण्याची मागणी शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे, अन्यथा जोडे काय असतात ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा : “…म्हणून राज्यपालांनी शिवरायांचा उल्लेख केला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलताना केलं आहे.