महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी संजय राऊत कुठे कुठे धावपळ करत होते, कोणाकडे हेलपाटे मारत होते, अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आता महाविकास आघाडीतला ठाकरे गटाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोण कोणाकडे जाण्यासाठी धावपळ करत होतं हे संजय राऊतांना बोलू नका. काही वर्षांपूर्वी कोण कोणाकडे जाण्यासाठी आटापिटा करत होतं, हे आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. परंतु आम्ही त्यावर काही बोलत नाही. आम्ही यावर बोलत नाही हा त्यांनी आमचा मोठेपणा समजावा. बंद मुट्ठी लाख की खुल गई तो खाक की, हे त्यांनी ध्यानात ठेवावं.

david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

हे ही वाचा >> “१२ वर्ष काँग्रेसने आम्हाला कधीच…”, नितेश राणेंनी वडिलांसमोर व्यक्त केली खंत

नितेश राणे यांनी नुकताच संजय राऊत यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. संजय राऊत हे १० जूनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावा राणे यांनी केला आहे. या दाव्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले, काही काम नसल्यावर हे लोक हात ज्योतिष बघायला सुरुवात करतात. त्यांना गांभीर्याने घेतलं जात नाही. मी माझी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अशा लोकांना कधीही गांभीर्याने घेतलं नाही. या लोकांना असं सोडून द्यावं. जोक्स मारू द्यावेत, आपण त्यावर फक्त हसायचं.