महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर आता वेगवेगळे तर्क आणि प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी हा जनमताचा कौल असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील भाजपा श्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असला, तरी आता एकनाथ शिंदे याबाबत नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शपथविधीसाठी विलंब होत आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांनी थेट अमित शाह यांचं नाव घेऊन निकाल फिरल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार निवडून आणून शरद पवारांनी सर्वोत्तम स्ट्राईक रेट नोंदवला. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील इतर पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचीही मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे या निकालाचं विश्लेषण आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून केलं जात आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बैठकीनंतर नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेली विधानं चर्चेत आली आहेत.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

एकनाथ शिंदे नाराज…

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब होत असल्याचं पाहून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाडांनी भूमिका मांडली. “महाराष्ट्राचं राजकारण एकनाथ शिंदेंमुळे झालं. ते नाराज होणार. एवढी मोठी जोखीम पत्करून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. जे काय केलं ते केलं. एवढं करूनही आज त्यांना काढून फेकून दिलं. हे योग्य नाही. ज्या व्यक्तीने हे सरकार बनवण्यात एवढी मोठी भूमिका निभावली, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा वापर केला. आता वेळ आली तर त्याला काढून फेकून दिलं. त्यांना वाईट तर वाटणारच”, असं आव्हाड म्हणाले.

“मरेपर्यंत शरद पवारांसोबतच”

दरम्यान, आपण मरेपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं आव्हाड म्हणाले. “आजच्या बैठकीत सगळ्या आमदारांनी एकमताने शरद पवारांनाच सगळे निर्णय घेण्याचे अधिकार दिले. “अजित पवार गटाकडून आणि स्वत: अजित पवारांचे आमच्या वेगवेगळ्या आमदारांना फोन जात आहेत. पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत की आता राहिलंय काय, या आमच्याकडे. आमच्याकडे राहिलेत ते फक्त शरद पवार. आमचं कुणीही या मानसिकतेत नाही की शरद पवारांना सोडून जायचं. ही अजित पवारांची जुनी सवय आहे. मी नाव घेऊनही सांगू शकतो की त्यांनी कुणाकुणाला फोन केले. मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबतच राहणार आहे”, असं ते म्हणाले.

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…

पिपाणीमुळे पक्षाचं नुकसान…

दरम्यान, पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. “पिपाणी चिन्हामुळे आमचं नुकसान झालं. आमच्या १० जागा पिपाणीमुळे पडल्या. दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात देवदत्त निकम यांच्याप्रमाणेच सारखंच नाव असणाऱ्या व्यक्तीला ४ हजार मतं पडली. वळसे पाटील १२०० ते १५०० मतांनी निवडून आले. त्यामुळे त्याचा फटका बसलाच”, असं ते म्हणाले.

“शेवटचे दोन दिवस अमित शाह जातात कुठे?”

दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवशी अमित शाह अचानक महाराष्ट्रातून निघून गेले आणि त्यानंतर निकाल फिरले, अशा आशयाचा दावा आव्हाडांनी यावेळी केला. “मला एक प्रश्न पडलाय. हरियाणाच्या प्रचाराच्या ऐन शेवटच्या दोन दिवस शाह हरियाणातून निघून गेले. महाराष्ट्राच्या प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत अमित शाह निघून गेले. हे दोन दिवस जातात कुठे हा एक चौकशीचा मुद्दा आहे. मग निवडणुका होतात आणि फिरतात. तेव्हाही त्यांनी जम्मू-काश्मीर दिलं आणि हरियाणा घेतलं. इथेही झारखंड दिलं आणि महाराष्ट्र घेतलं. हे संशयास्पद आहे”, असं ते म्हणाले.