अजित पवारांनी कधी पक्षाचं पद उपभोगलं आहे का?, एकदाही त्यांनी पक्षाचं कुठलंही पद उपभोगलं नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यात शरद पवारांनी एका पोराला मोठं करण्याचं जे बापाचं योगदान असतं, ते योगदान दिलंय, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर आज ( २४ नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली, त्यानंतर जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : “असाही तर्क लावला जाऊ शकतो की…”, EC तील सुनावणी संपल्यानंतर सुनील तटकरेंचं मोठं विधान!
”शरद पवारांनी रक्त आटवून पक्ष वाढवलाय, अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही. एका रात्रीत नवरा-बायकोंनाही घटस्फोट मिळत नाही. जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला, मला आता अध्यक्ष राहायचं नाही, असं सांगितलं तेव्हा आमच्या सगळ्यांची बैठक झाली. त्यात १७ जण निवडले गेले. त्या १७ जणांनी बसून अध्यक्ष कोणाला करायचं याचा निर्णय घ्यावा, त्यांच्यातही एकमताने ठरवलं गेलं. शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहतील. त्यावर अजित पवार आणि आताच्या आठ मंत्र्यांनी स्वाक्षरी केली होती. त्यामुळे वाद कुठे आहे. वाद हा पक्षाचा नाही आहे, वाद हा सत्तेचा आहे, अशी टीका अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
हेही वाचा : “दादा, दादा, दादा करत आयुष्य गेलं, मग…”, सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
शरद पवारांनी रक्त आटवून अन् घामाचा एक एक थेंब देऊन हा पक्ष वाढवलाय, २००४ साली रक्त शरीतातून ओथंबून वाहत असताना प्रचाराला फिरलेत. मांडीचं हाड मोडलं असताना पक्षासाठी काम केलंय. अजित पवारांनी कधी पक्षाचं पद उपभोगलं आहे का?, एकदाही त्यांनी पक्षाचं कुठलंही पद उपभोगलं नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यात शरद पवारांनी एका पोराला मोठं करण्याचं जे बापाचं योगदान असतं, ते योगदान दिलंय, असंही जितेंद्र आव्हाडांनी अधोरेखित केलंय.