महाराष्ट्रात गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून गद्दार नावाचा सिनेमा सुरू आहे अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. या बैठकीत विविध नेते भाषण करत आहेत. त्याच बैठकीत भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

महापालिकांमध्ये इलेक्टेड बॉडी नाहीत ही सरकारसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. शासनाचा फोन येतो. आयुक्तांना कळवलं जातं. वरच्या वर गोष्टी ठरतात. आता ते काही होतच नाही हेच सगळं ठरवत आहे. एकंदरीतच सोन्याचं अंडं देण्याऱ्या महापालिका यांच्याकडे आहेत. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांनी रंगांचं कंत्राट ज्या पद्धतीने दिलं आहे त्याला काय म्हणावं? कुठलेही रंग बघा अंगावर येणारे रंग. कुठलीच नियमावली फॉलो केली जात नाही. नगरविकास खातं आणि आयुक्त यांच्यातच निर्णय होतात त्यामुळे भ्रष्टाचाराला मोकळं रान राज्यात मिळालं आहे. लुटो, खाओ हीच परिस्थिती मुंबई, ठाण्यात आणि पुण्यात सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

गद्दार नावाचा सिनेमा महाराष्ट्रात सुरू आहे

आता तर सोपं झालं आहे कुठल्याही कार्यक्रमाचं उद्घाटन केलं की या कामसाठी ५० हजार कोटी रूपये देण्यात येत आहेत असं जाहीर केलं जातं. आधी तुमचे खिसे किती भरले आहेत ते सांगा. महाराष्ट्रावर किती कोटींचं कर्ज आहे ते सांगा. खिशात पैसा नाही आणि आव कसला आणता आहात? हजार कोटी वगैरे चिल्लर वाटू लागली आहे. मला दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो आहे. अमिताभ लिफ्टमध्ये शिरतो आणि म्हणतो की दावर अगर मै आपको बता दू की सामंत का सोना कहाँ और किस वक्त आने वाला है? तो कितना इनाम दोगे तर दावर म्हणतो की पाच लाख त्यावर अमिताभ म्हणतो की सोना पचास लाख का है. दिवार सिनेमा आला तेव्हा ५० लाख ही मोठी रक्कम होती. आता मात्र हे हजार कोटी वगैरे तसेच मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही रक्कम असते. त्यांच्यासाठी ५० लाख काहीच नाही. गेले सहा-आठ महिने राज्यात गद्दार नावाचा सिनेमा लागला आहे. तिथे पैशाला किंमत नाही कारण माणसांची किंमतच ५० खोके केली आहे.

विद्रोही रॅपर असतात शुभम जाधव, राज मुंगासे हे काही पोरं रॅप साँग लिहितात. त्यांनी पचास खोके हे गीत आणलं. त्यात एकही शिवी नाही कुणाचंही नाव नाही. राज मुंगासेच्या भावाला चार वाजता ताब्यात घेतलं आणि अख्खा महाराष्ट्र फिरवला. राज अतिशय हुशार पोरगा होता. त्याने मोबाईल बंद केला होता. पोलिसांच्या हाती न लागता जामीन घेऊन बाहेर आला. मला तो म्हणाला की मी शिवी दिली नव्हती पण ५० खोके म्हटलं होतं. यांनी स्वतःच्या अंगावर ५० खोके लावून घेतले. मी घोषणा दिली तरीही ५० खोके एकदम ओके म्हणतात. त्याला तुम्ही कसं अडवणार असंही जितेंद्र आव्हाड यांनी विचारलं आहे. हे मुघलांपेक्षा भयंकर लोक महाराष्ट्रावर राज्य करत आहेत अशीही टीका आव्हाड यांनी केली.