Jitendra Awhad in Maharashtra Assembly Session 2025 : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (३ मार्च) सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांचे आमदार मोठ्या संख्येने विधीमंडळात दाखल झाले आहेत. दरम्यान, या अधिवेशनासाठी विधीमंडळ परिसरात दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण, आव्हाड एक मोठा दगड घेऊन विधीमंडळ परिसरात पोहोचले होते. आव्हाडांचा असा अवतार पाहून सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना हा दगड विधीमंडळात आणण्यामागचं कारण विचारलं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हे आपल्या राज्यातील महायुतीच्या सरकारचं हृदय आहे. कारण याला पाझरच फुटत नाही. एकवेळ पाषाणाला पाझर फुटेल. परंतु, आपल्या सरकारला पाझर फुटणार नाही.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा