उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना लक्ष्य केलं आहे. “शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच”, असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. अजित पवारांच्या विधानानंतर उत्तर-प्रत्युत्तर सुरू झालं आहे. यातच यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. “अजित पवार मोठे नेते, ते कुणालाही पाडू शकतात,” असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “दमदाटीकरणं हाच अजित पवारांचा स्वभावदोष आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘ए गप्प बस रे’, ‘उठू नको’ असं अजित पवार बोलत होते. पण, तुम्ही घरी नसून सार्वजनिक जीवनात आहात. त्यामुळे अशी विधान करणं योग्य नाही.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”

“जगात माणूस यमाला घाबरत नाही”

“तसेच, तुला पाडून दाखवतो, अशी वक्तव्य करता येत नाही. अजित पवार मोठी माणसं आहेत. ते कुणालाही पाडू शकतात आणि ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात. प्रत्येकाला घाबरवणं हे कुणालाही शक्य होत नाही. जगात माणूस यमाला घाबरत नाही. त्यामुळे बाकीच्यांना कशासाठी घाबरायचं,” असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “शिरूरमधून उमेदवार निवडून आणणारच”, अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हे म्हणाले, “मी १०० टक्के…”

अजित पवार काय म्हणाले होते?

“एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं आहे. मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती.

“जनाधार पाहून उमेदवारी देतो”

“२०१९ साली शिरूरमध्ये योग्य पद्धतीनं उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसं काम करायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच,” असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं.

Story img Loader