काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटानं आपल्या पक्षाचा पहिला मेळावा घेतला होता. या सभेतून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवाय शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं, असा सल्लाही अजित पवारांनी दिला होता. यावेळी अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवरही जोरदार टीका केली होती. ठाण्याच्या पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, असा आरोप अजित पवारांनी केला होता.

अजित पवारांच्या या टीकेला स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांना मी समजावू शकतो किंवा ते माझं ऐकतात, हे फक्त अक्कल नसलेल्या माणसाला वाटू शकतं. जगात ज्याला अक्कल आहे, त्याला माहीत आहे, शरद पवार कुणाचंच ऐकत नाहीत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीकास्र सोडलं आहे. ते ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- “भारतात कधीही कुणालाही अटक होऊ शकते, जामीनही मिळणार नाही”, सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांचं विधान

ठाण्याच्या एका पठ्ठ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तुमच्यावर त्यांचा विशेष राग आहे का? असा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवारांना मी समजावू शकतो किंवा ते माझं ऐकतात, हे फक्त अक्कल नसलेल्या माणसाला वाटू शकतं. जगात ज्याला अक्कल आहे, त्याला माहीत आहे, शरद पवार कुणाचंच ऐकत नाहीत. सगळ्यांचं ऐकून स्वत:चा निर्णय घेणारा भारतातला एकमेव नेता म्हणजे शरद पवार. ते माझं कसं काय ऐकू शकतात.”

हेही वाचा- खळबळजनक! भर बैठकीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करत शरीराचे केले तुकडे

“अजित पवारांच्या विधानाचं मलाच आश्चर्य वाटलं, त्यांनी मला मोठं करून टाकलं. शरद पवारांनंतर त्यांनी थेट जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. मला या गोष्टीचा आनंद झाला. कधी कधी अशी टीका आपल्याला विनोद म्हणून घ्यावी लागते. पण होय, मी ठाण्याचा पठ्ठ्या आहे. त्यांनी टीका केली म्हणून आपण स्वत:ला कमी लेखून का घ्यायचं,” असंही जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले.

Story img Loader