शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यामध्ये वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. बाबासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रामधून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. अनेकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वैचारिक पातळीवर उघडपणे विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवरुन पुरंदरेंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

नक्की पाहा >> Video: १०० व्या वाढदिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणालेले, “आयुष्याची आणखी २-३ वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की…”

जितेंद्र आव्हाड यांनी दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये आपण माणूस म्हणून बाबासाहेब पुरंदरेंना कधीच विरोध केला नव्हता असं म्हटलं आहे. “माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही. काही लिखाणावर आक्षेप होता. ब. मो. पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरेंचं निधन : “त्यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी…”; सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली

“ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचं दुःख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्तसुद्धा मुद्दे होते. पण त्यासंबंधीचं भाष्य करण्यासाठी मी जाणकार नाही. कुणीही काहीही मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा लोक काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान विसरता येणार नाही,” असं पवार म्हणाले.

Story img Loader