Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. तसेच महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. त्याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. मात्र, असं असलं तरी विधानसभेच्या निकालाबाबत आता अनेक नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“ईव्हीएमबाबत काही जणांनी उदाहरणासह दाखवलं आहे की १३८ ते १३८ आणि पुढे काही वाढवले, म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलेला आहे आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झालं. आता काही जणांचे मतदारसंघ बालेकिल्ले समजले जातात. मग त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झाली. मी हे आज बोलत नाही, आज शरद पवार यांनाही मी सांगितलं की आपल्याला ईव्हीएमविरोधात लढावं लागेल. अन्यथा ईव्हीएम आपल्याला रशियाकडे घेऊन जाईन. जसं पुतिनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपवून टाकलं तसं आपल्याकडेही होऊ शकतं”, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
nitin Gadkari constitution of India
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

हेही वाचा : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची अद्याप माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…”

“आपल्याकडे एखादे प्रकरण लोकांना समजून सांगावं लागतं. तसं आम्हालाही याबाबत करावं लागेल. विरोधकांना व्यवस्थितरित्या संपवून टाकायचं हा प्लॅन दिसत आहे. आता चार महिन्यांपूर्वी दोन लाख ४० हजार मतांनी चंद्रपूरची जागा निवडून येते आणि आता एक लाखांनी पाठिमागे जाते? मग एवढं काय घडलं? नांदेडची लोकसभा महाविकास आघाडीला येते पण सर्व विधानसभा तिकडे जातात. याचा अर्थ जिल्ह्याजिल्ह्यात पॅटर्न दिला आहे. एवढी मते आणि एवढी मते अशा पद्धतीचा पॅटर्न दिला. मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

“एका आमच्या पक्षाची ही गोष्ट नाही. सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे. तसं दिल्लीत शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. तशा प्रकारचं आंदोलन उभं करावं लागणार आहे. याबाबतची मानसिक तयारी आमची झाली आहे”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.