Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आलं. तसेच महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. त्याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. मात्र, असं असलं तरी विधानसभेच्या निकालाबाबत आता अनेक नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Mahavikas Aghadi : विधानसभेतील अपयशानंतर ‘मविआ’ मोठा निर्णय घेणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत; म्हणाले, “विरोधी पक्षांच्या माध्यमातून…”
Maharashtra Vidhansabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2024 at 17:05 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSजितेंद्र आव्हाडJitendra AwhadमहायुतीMahayutiमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महाविकास आघाडीMahavikas Aghadiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on evm electronic voting machine maharashtra vidhansabha election 2024 politics gkt