Jitendra Awhad On Namdeo Shastri Statement on Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोग गावचे सरपच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या काही दिवासंपासून चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करत त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले, तसेच गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. यानंतर भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे, असे नामदेव शास्त्री यांनी जाहीर केले आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे. यावेळी आव्हाडांनी “डॅा. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे समर्थन करणे आत्यांत दुर्दैवी आहे”, अशी भावना व्यक्त केली आहे.

former MLA ratnagiri Rajan Salvi subhash bane Ganpat Kadam
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News LIVE Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Ajit Pawar Said About Sharad Pawar?
Ajit Pawar : “शरद पवारांचं राजकारण मलाच नाही तर महाराष्ट्रात कुणालाच…”, अजित पवार काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये विविध आरोप करत काही लोकांची यादी देखील दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरून अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणार्‍या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या धंनजय मुंडे वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुंडे वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे. धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वकांक्षेसाठी उध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देतोय, त्या सर्वांना आणि धंनजय मुंडे वाल्मीक कराड यांना भगवान गडावर समाजाची परीषद बोलावून समोरासमोर बसून चर्चा घडवून आणा, म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे किती मोठे संत आहेत हे संपूर्ण जगाला कळेल.

ज्यांचे खून झालेत असे….

१) मयत संगीत डिघोळे परळी यांचे कुटुंब
२) मयत काकासाहेब गर्जे परळी यांचे कुटुंब
३) मयत महादेव मुंडे परळी यांचे कुटुंब
४) मयत बापु आंधळे परळी यांचे कुटुंब
५) मयत बंडु मुंडे परळी यांचे कुटुंब

ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले घडवून आणले आहेत असे..

१) महादेव गित्ते परळी
२) सहदेव सातभाई परळी
३) राजाभाऊ नेहरकर परळी

ज्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले असे…..

१) प्रा. शिवराज बांगर, बीड
२) बबनभाऊ गित्ते, परळी
३) रामक्रष्ण बांगर, विजयसिंह बांगर, पाटोदा
४) करूणा धंनजय मुंडे, परळी
५) प्रकाश मुंडे नाथ्रा, परळी
६) राजाभाऊ फड, परळी

अशी खुप मोठी समाजातील लोकांची यादी आहे, (इतर समाजाची यादी जोडल्या ती फार मोठी होईल) ज्यांना घेवून मी आपल्याकडे येतो, यांच्या वेदना आणि त्यांना वेदना देणारा कोण आहे? हे आपण महंत म्हणून विचारणार का?

धनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईन पेक्षा धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यामुळे अनाथ झालेली लेकरे, विधवा झालेल्या बायका, आपल्या पोटच्या मुलांना गमावून सतत डोळ्यातून आसवे गाळणारे आई-बाप, यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याने कायम अधु झालेले लोक, यांनी खोट्या गुन्ह्यांत अडकवल्यानंतर तुरूंगात खितपत पडलेले किंवा रानोमाळ भटकंती करणारे लोक यांचे दु:ख फार मोठे आहे. महंत म्हणून आपण हे दु:ख समजावूण घेणार आहात का?

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, गोट्या गित्ते , धनराज फड, सुनिल फड, विष्णु चाटे, रघु फड, यांसारखे समाजातील शेकडो तरुण स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगार बनवलेत. त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था आहे?.”

Story img Loader