Jitendra Awhad on EVM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला आहे. यानंतर अनेकांनी ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपवार माहितीशिवाय भाष्य करण्यास नकारल दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सातत्याने ईव्हीएम यंत्राबाबत विविध माहिती पुढे आणत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीचे ते मोठ्या मताधिक्याने कसे निवडून आले, याबाबत माहिती दिली होती. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये, म्हणून त्यांनी त्यांची टीम कामाला लावली होती. आता त्यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत आणि गावात ३१२ जणांनी मतदान केले होते. मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

jitendra awhad on maharashtra assembly election results 2024
निकाल फिरल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांनी थेट अमित शाहांचं घेतलं नाव; म्हणाले, “ऐन प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत…”!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde, Eknath Shinde withdrawal from the post of Chief Minister, Shivsena Activist, Eknath Shinde Resignation,
Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदावरून शिंदे यांची माघार? शिवसेनेचा आक्रमकपणा मावळला
Ramdas Athawale on Eknath Shinde
Who is Chief Minister of Maharashtra Live: “फडणवीस चार पावलं मागे आले होते, शिंदेंनी दोन पावलं तरी…”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Eknath Shinde Social Media Post viral
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…
Eknath Shinde C. P. Radhakrishnan devendra fadnavis ajit pawar deepak kesarkar
भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”
Karuna Munde allegation on Dhananjay Munde Assembly Election
Karuna Munde: धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांना मिळाली ‘एवढी’ मते

हे वाचा >> Jitendra Awhad: “मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?” ईव्हीएमच्या गोंधळात जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल

मतदान झाले ३१२, मतमोजणीत निघाले ६२४

“३१२ जणांनी मतदान केले असताना शिवसेना (UBT) – १९४, शिवसेना (शिंदे) – ३२६, अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४ असे मतदान झाले आहे. या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ इतकी होते. EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!”, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांत आलेल्या काही बातम्या शेअर केल्या आहेत. द वायरने दिलेल्या बातमीनुसार, महाराष्ट्रात ५ लाख ४ हजार ३१३ अधिकचे मतदान दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यात तफावत असल्याचे या बातमीत म्हटले गेले. आव्हाड यांनी ही बातमी शेअर करत निवडणूक आयोगाला यावर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले आहे.

दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली आहे. “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. “नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो. निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत”. असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.