महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल मुंबईत पार पडली. या सभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाषणं केली. या भाषणावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आव्हाड म्हणाले, मुंबई महाराष्ट्राला अशीच मिळाली नाही त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. ही मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. परंतु मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं काम गेल्या दहा वर्षात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हाड म्हणाले, “विविध संस्थांची मुख्य कार्यालयं जी मुंबईत होती ती आता अहमबादला जात आहेत, दिल्लीला जात आहेत. कारण मुंबईवर राग असलेली माणसं दिल्लीत बसली आहेत. त्यांना मुंबईचे पाय कापायचे आहेत.” दरम्यान, राज्यातल्या शिंदे – फडणवीस सरकारलाही त्यांनी धारेवर धरलं. अलिकडच्या काळात राज्यात काही रॅप गाणाऱ्या तरुण कलाकारांवर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली आहे. या कारवाईचा आव्हाड यांनी निषेध नोंदवला. तसेच स्वतःदेखील एक रॅप साँग आव्हाड यांनी गायलं.

आव्हाड म्हणाले, रॅप साँग लिहणाऱ्या पोरांना या लोकांनी जेलमध्ये टाकलं. आता मी त्यावर स्वतःची कविता केली आहे.

हे ही वाचा >> “आधी स्वत:चा पक्ष अन् आदित्य बाळाला सांभाळा, मग…”; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

आव्हाडांचं रॅप साँग

अरे पचास खोका…
अरे पचास खोका तुमने खाया… महाराष्ट्रने क्या पाया?
अरे पचास खोका… महाराष्ट्रने क्या पाया?
लडके ने उसके गले मे लाया, तो पुलिसने उसे जेल में लाया
अरे पचास खोका तुमने खाया… महाराष्ट्रने क्या पाया?
अरे पचास खोका बोलतेही तुम क्यूं चिडते हो?
अरे पचास खोका बोलतेही तुम क्यूं चिडते हो?
अपनाही रिश्ता पचास खोके से क्यूं जोडते हो?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad rap song video are pachaas khoka mahavikas aghadi vajramuth sabha asc
Show comments