Jitendra Awhad On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला आहे. तर महायुतीला विक्रमी विजय मिळाला आहे. यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून ईव्हीएम (EVM) वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपवार माहितीशिवाय भाष्य करणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्याने यासंबंधी आकडेवारी सादर करत प्रश्न विचारले जात आहेत. राज्यात आणि देशभरात ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत असतानाच आता जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक दावा केला आहे.
निवडणुक निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांबद्दल माहिती देणारे निवडणूक आयोगाचे ‘वोटर टर्नआऊट’ (Voter turnout) हे अॅप बंद झाल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. “सगळा नग्न झालेला निवडणूक आयोग आता अॅप्लिकेशन बंद करुन नग्नपणा झाकायचा प्रयत्न करत आहे. काल परवापर्यंत लोकसभेचा डाटा अॅक्सेस करता येत होता. मग विधानसभेच्या वेळेला का बरं बंद केला?”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. “गोलमाल है भाई सब गोलमाल… इलेक्शनची मतदानाची टक्केवारी बदलते कशी”, असेही आव्हाडांनी म्हटले आहे.
मनसे उमेदवाराला फक्त दोनच मतं
आव्हाड यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार राजेश येरूणकर यांचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. येरूणकर यांच्या घरात चार मतदार असताना अवघी दोन मते पडली आहेत. आव्हाड म्हणाले की, “राजेश येरूणकर सांगत आहेत की, मी उमेदवार असलेल्या भागात मनसेला फक्त २ मते मिळाली. माझ्या आई, पत्नी, मुलीने सुद्धा मला मतदान केले नाही हे शक्य नाही. ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के भरलेली होती. फॉर्म क्र. १७सी आणि ईव्हीएम अनुक्रमांक जुळत नाहीत. ही लोकशाहीची हत्या आहे”.
मतदान झाले ३१२, मतमोजणीत निघाले ६२४
मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी देत निवडणुक प्रक्रियेवर शंका व्यक्त केली होती. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत आणि गावात ३१२ जणांनी मतदान केले होते. मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >> D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”
“३१२ जणांनी मतदान केले असताना शिवसेना (UBT) – १९४, शिवसेना (शिंदे) – ३२६, अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – १०४ असे मतदान झाले आहे. या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ इतकी होते. EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!”, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केली आहे.
याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजेत्या उमेदवारांची एक यादी देखील शेअर केली आहे. ‘ईव्हीएमचा सेट पॅटर्न’ असे कॅप्शन देत सादर केलेल्या यादीत महायुतीच्या विजेत्या उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते देण्यात आली आहेत. यामध्ये उमेदवारांना जवळपास एकसारखीच मते मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
रोहित पवारांनीही उपस्थित केले प्रश्न
आव्हाड यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली आहे. “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. “नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो. निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत”, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.