काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट असं अचानक सत्तेत सामील झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या सत्तांतरानंतर काही तासांतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली होती. पवारांची एक टीम सत्तेच्या दिशेनं रवाना झाली आहे. लवकरच दुसरी टीमही सत्तेत सामील होईल, अशा आशयाचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनर्उच्चार केला.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, “अजित पवारांचा शपथविधी झाला त्या दिवशी मी पहिल्या एका तासात एक ट्वीट केलं होतं. त्यात मी पहिली टीम रवाना झाली असं म्हटलं होतं. सगळं तसंच होत आहे. आजही अजित पवार गटाचे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यावर अजित पवारांच्या फोटोसह शरद पवारांचे फोटो लागले आहेत. किती खोटं वागावं याला काही मर्यादा आहेत की नाहीत.”

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”!
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”

हेही वाचा- “खेकड्यांना सांभाळलं असतं तर…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला

राज ठाकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “त्यांची (राज ठाकरे) भूमिका किती दिवसांनी बदलत राहते, हे त्यांना विचारा.”

हेही वाचा- “…तेव्हा मी अमेरिकेत जाऊन बसणार”, बच्चू कडूंचं मोठं विधान…

“अजित पवार आणि शरद पवारांची मिलीभगत”

अजित पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, “शरद पवारांचं राजकारण मी खूप वर्षांपासून पाहतो आहे. त्यांचं हे असंच आहे. अजित पवार आणि शरद पवारांची मिलीभगत आहे. राज्याला विरोधी पक्षनेता तर सोडाच, पण विरोधी पक्षही नाही. कोणता पक्ष विरोधी पक्ष हे सध्या मला कळतच नाही. आमचा एकच पक्ष सध्या विरोधी पक्ष दिसतो आहे. बाकी सगळ्यांचेच लागेबांधे आहेत.”