रॅप गाण्यातून सरकारविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारने राज मुंगासे आणि उमेश खाडे या दोन रॅपर विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. रॅपर राज मुंगासे या तरुणाला काल पोलिसांनी अटक केली होती. तर उमेश खाडे यालाही वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या रॅपर्सच्या समर्थनार्थ उतरले आहेत. रॅप गाण्यात कुणाचंही नाव घेतलं नाही, तरीही संबंधित तरुणांवर कारवाई केली जात आहे, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

रॅपर उमेश खाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्याची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आव्हाडांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “गरीब बिचाऱ्याचं हातावरचं पोट असतं. अशातून जेव्हा कलाकार तयार होत असतो. त्यांचं नरडं दाबून कायमचं शांत करणं बरोबर नाही. विद्रोहाचा आवाज तुम्ही कधीही बंद करू शकत नाही. तुम्ही एकाचा आवाज दाबला तर १०० नवे आवाज तयार होतील, असं आव्हाडांनी म्हटलं.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
lawrence bishnoi brother anmol bishoi
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Bigg Boss 18 Salman Khan was upset after hearing the accusations and counter-accusations of the wild card Digvijay singh rathee kashish kapoor
Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांचं ‘ते’ कृत्य पाहून सलमान खानने लावला डोक्यालाच हात, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा- “हा सरकारचा कबुलीजबाब”, रॅपर राम मुंगासेच्या अटकेवरून रोहित पवारांचा टोला, म्हणाले, “५० खोके शब्दामुळे…”

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रसिद्ध साहित्यिक नामदेव ढसाळ हे विद्रोही होते. परिस्थिती आणि त्यांच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचाराचे डाग त्यांच्या हृदयावर कोरले होते. त्याच जखमेचं रुपांतर पुढे शब्दात झालं आणि शब्दातून कविता तयार झाली. विद्रोह ही महाराष्ट्राची परंपरा आहे. संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर या सर्वांनी विद्रोह केला होता, म्हणून देश निर्माण झाला. त्यामुळे विद्रोही चळवळी अशा दाबता येत नाहीत. तुम्ही एकाला दाबलं तर १०० तयार होतील.

हेही वाचा- VIDEO: रॅप गाण्यातून मराठी तरुणानं शिंदे गटाला धू धू धुतलं! आव्हाडही उतरले मैदानात; म्हणाले, “याला अटक करू नका”

“संबंधित रॅपला म्युझिक देणारे आणि मिक्सींग करणारे याच झोपडपट्टीत राहतात. यांच्यावर करावाई केली जात आहे. गरीबांना घाबरवणं सोपं असतं. गरीब बिचाऱ्यांचं हातावरचं पोट असतं. अशातून जेव्हा कलाकार तयार होत असतो, तेव्हा त्याचं नरडं दाबून त्यांना कायमचं शांत करणं बरोबर नाही. विद्रोहाचा आवाज तुम्ही असा बंद करू शकत नाही,” असंही आव्हाड म्हणाले.