Jitendra Awhad Reacts on Rupali thombare Alleged WhatsApp Chat Shivraj Bangar : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. वाल्मिक कराड हा या हत्येमागचा सूत्रधार असल्याचा आरोप बीडमधील जनता व अनेक लोकप्रतिनिधिंनी केला आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे व त्यांचा पक्ष (अजित पावारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) वाल्मिकला पाठिशी घालत असल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला अटक करावी, देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी या मोर्चाच्या उद्दीष्टांवर शंका उपस्थित केली आहे. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ठोंबरे यांनी एक्सवर एक कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड व बीडमधील रहिवासी शिवराज बांगर यांच्यामधील हे चॅट असल्याचा दावा ठोंबरे यांनी एक्सवर केला आहे. यासह ठोंबरे म्हणाल्या आहेत की “सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी ते जितेंद्र आव्हाडांनी सांगून टाकावं”.

Uttam Jankar on Ajit Pawar
Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Maharashtra liquor sale loksatta news
निवडणूक वर्षात ७२ कोटी ७० लाख लिटर मद्यविक्री !
ajit pawar santosh Deshmukh murder
अजित पवारांचे सूचक मौन, देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Sudhir Mungantiwar On Maharashtra Cabinet Expansion
Sudhir Mungantiwar : “आयुष्यात काहीक्षण धुकं येतं, पण…”, सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान
supreme-court-
“प्रत्येक वैयक्तिक मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

हे ही वाचा >> Sudhir Mungantiwar : “आयुष्यात काहीक्षण धुकं येतं, पण…”, सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान

रुपाली ठोंबरे यांनी शेअर केलेल्या चॅटमध्ये नेमकं काय आहे?

या चॅटमधील व्यक्ती म्हणतेय की “उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज, मी पहिली तुझी भेट घेईन, नंतर मोर्चा कडे जाईन. मुंडे व वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळ पासून प्रयत्न करतोय.

यावर शिवराजचं उत्तर : सुरु आहे फोन माझा… ५१५१ बंद आहे तात्पुरता… मी सगळी तयारी केलीय

आव्हाडांचा कथित मेसेज : बरं, मोर्चात मुस्लीम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशाची काळजी करू नको. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्याला ही संधी द्यावी मी सांगितलं आहे. कसं, काय, कुणावर बोलायचं… उद्या मुंडे ला घो* लावू… कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू आता…

शिवराजचं उत्तर : याचीच वाट पाहतोय मी… किती वाजता पोहोचताय तुम्ही?

हे ही वाचा >> Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं

जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

दरम्यान, रुपाली ठोंबे यांची पोस्ट रिपोस्ट करत आव्हाडांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट माॅर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असूनदेखील सत्य – असत्य न तपासता त्यांनी हे माॅर्फ केलेलं चॅट वायरलं. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपलं आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हे चॅट या भूमीवर अवतरलं. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला?”

“असो, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविला आहे.
ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे. तो शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्या कराडने जंगजंग पछाडले. शिवराज बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलीसही त्याच्यावर पटापट गुन्हे नोंदवितात. सर्वात हास्यास्पद गुन्हा म्हणजे, शिवराज बांगर याने वाल्या कराडकडून खंडणी मागितली, आहे की नाही विनोद!”

Story img Loader