‘द केरला स्टोरी’ या सिनेमाची चर्चा चांगलीच होते आहे. अशात जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य या सिनेमाबाबत केलं त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर प्रदीप कुरुलकर यांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांनी ट्रोसर्सना प्रश्न विचारला आहे. तसंच प्रदीप कुरुलकर यांनी बाईसाठी देश विकला अशीही टीका केली आहे.

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

त्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. आता कुरुलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ.राज्य .राष्ट्र नसते .हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका

नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल ? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आतामात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे.

द केरला स्टोरी या सिनेमात खोटी माहिती दाखवणाऱ्या दिग्दर्शकाला फासावर लटकवलं पाहिजे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावर आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Story img Loader