अजित पवारांसह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर अजित पवार गटाकडून दावा केला आहे. यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच शरद पवार गटाने अजित पवार गटातील १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आज किंवा उद्या अजित पवार गटातील आमदार नक्की अपात्र ठरतील, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. १२ आमदारांना पाठवलेल्या नोटीसबद्दल विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आला आहे. त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की, संबंधित आमदार आज नाहीतर उद्या अपात्र ठरणारच आहेत. आता प्रक्रिया सुरू झाली आहे. तिच प्रक्रिया आम्हालाही लागू होईल. त्यामुळे मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी नोटीस पाठवली आहे.”

prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा

हेही वाचा- “राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकला आणि…”, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

अजित पवारांनी शुक्रवारी रात्री ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन प्रतिभा पवार (शरद पवारांच्या पत्नी) यांची भेट घेतली आहे. याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “ती कौटुंबीक भेट होती. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या हाताला इजा झाली आहे. शेवटी त्यांचं ते नातं आहे. अजित पवार अनेक वर्षे त्यांच्या घरात राहिले आहेत.”

हेही वाचा- “वाटेल ती किंमत मोजू पण… “, सत्ताधाऱ्यांचा उल्लेख करत रोहित पवारांचा थेट इशारा

“शेवटी अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील लढाई वैचारीक आहे. ते वैमनस्य रक्ताशी नसतं. शरद पवारांची प्रचंड महानता आहे. कारण नातीगोती बाजुला आणि विचार आधी… हा शरद पवारांचा किती मोठा निर्णय आहे. आजच्या तरुण पिढीला त्यांनी एक दिशा दाखवली की विचारांशी कधीही तडजोड करू नका,” असंही आव्हाड म्हणाले.

Story img Loader