महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या ट्विटरवर जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या एका बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी नुकतीच राज ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावरून अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर केलेल्या टीकेनंतर त्याला आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा थेट ऑनलाईन सामना सध्या ट्विटरवर पाहायला मिळत आहे.

नेमकं झालं काय?

काही मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये राज ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर्स लावले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी “सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही”, असा चिमटा काढला होता. त्यावरून मनसेच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली.

Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Will Kangana Ranaut be a headache for BJP after controversial statement
कंगना रणौत यांना हे सुचतं तरी कसं? त्या भाजपसाठी डोकेदुखी ठरतील का?

“जितेंद्र आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवू. चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात. जितेंद्र आव्हाड पदवीधर निवडणुकीसाठी नाक घासत शिवतीर्थावर पाठिंबा मागण्यासाठी आले होते”, असा टोला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही खोचक ट्वीट केलं होतं.

“…आणि उरलेली रक्कम बागडे घरी घेऊन जातो”, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; ट्वीट केली ‘ती’ ऑडिओ क्लिप!

खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं

“जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही”, असं ट्वीट करत अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.

दरम्यान, अमेय खोपकरांच्या या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा खोचक ट्वीट करत थेट राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेलं उत्तरही लोकांना आठवतं आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे दोन सत्ताधारी पक्षांमध्येच जाहिरातीचा वाद चालू असताना दुसरीकडे आव्हाड आणि मनसेमध्ये ट्विटरवर कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.