राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मुलीबाबत केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय वर्तुळातून या विधानावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येत असून त्यावरून जितेंद्र आव्हाड आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ट्विटरवर कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आव्हाडांनी खोत यांना परखड सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं झालं काय?

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानावरून या वादाला सुरुवात झाली. आव्हाडांनी मंगळवारी विधानभवन परिसरात एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेवरून चर्चा सुरू झाली. “माणसाला भीती खात असते. रात्री ३ वाजता टकटक झालं, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते. ध्यानी-मनी-स्वप्नीच नसतं कुणाच्या घरात कोण घुसेल हे… यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? पण तिला जर उद्या नुसतं बोलवलं, तरी ती आत्महत्या करेल”, असं खळबळजनक विधान केलं होतं. त्यावरून सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर निशाणा साधला आहे.

“आमच्या मुली इथेच मोठ्या होतील”

सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात ट्वीट करताना जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. “हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठ्या होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण मुलगी पाठवणार आहात का?” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावरून भाजपाची आगपाखड; म्हणे, “हा महाराष्ट्रद्रोह नाही तर काय? आदित्य ठाकरेंनी यावर..”!

“उगाच शिवरायांना बदनाम करू नका”

दरम्यान, खोत यांच्या ट्वीटला रिप्लाय करताना आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तरादाखल परखड सवाल केला आहे. “शिवरायांनी धाडसी राजकारण केले. शत्रूच्या बायका-मुलं-मुलींना छळले नाही. उगाच त्यांचा कारभर आणि त्यांना बदनाम करू नका. तशी शिकवण जिजाऊंची होती. राज्यपाल जेव्हा छत्रपतींबद्दल बोलले तेव्हा कुठे होतात?” असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

विश्लेषण : थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याचं नाव आलेलं ‘निलांबरी सदनिका प्रकरण’ आहे तरी काय? वाचा सविस्तर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या ११ सदनिका ईडीनं मंगळवारी कारवाई करत जप्त केल्या. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी आपल्या मुलीविषयी विधान केलं होतं.