‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘बल्क ड्रग पार्क’ हे प्रकल्प मागील दोन महिन्यांच्या कालावधीत गुजरातला गेले होते. त्यातच आता आणखी एक धक्का महाराष्ट्राला बसला आहे. नागपुरात होणारा ‘टाटा-एअरबस’ हा प्रकल्पही गुजरातमधील बडोद्यात होणार आहे. त्यामुळे तीन महिन्यात तीन प्रकल्पांना महाराष्ट्राला मुखावं लागलं आहे. त्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा महाराष्ट्रातील तरुणांवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ” एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रातून अचानक, असा का गेला हे समजत नाही. महाराष्ट्रातील तरुणांवर हा अन्याय आहे. या आधी अनेक लोक हे महाराष्ट्रात नोकरीं, धंद्यासाठी येत होते. परंतु, आता गुजरातला जातील. राज्यकर्ते जर हे थांबू शकत नसतील, तर हे त्यांचं खूप मोठं अपयश आहे.”
हेही वाचा : “जाऊ द्या, जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”, अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!
“वेदांन्तानंतर सांगितलं होतं, मोठा प्रकल्प येणार आहे. त्याचं काय झालं माहिती नाही. प्रकल्प जातं असतील, तर महाराष्ट्राची अस्मिता मलीन केली जातं आहे. औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला होता, आता ते चित्र राहिलेलं नाही. महाविकास आघाडीकडून चूक झाली असेल तर, आता ती सुधारायला पाहिजे होती. महाराष्ट्राची दिल्लीत एवढी चालते, तर त्यांनी रॉकेटचे प्रकल्प देखील आणले पाहिजे होते,” असा टोलाही आव्हाड यांनी शिंदे-भाजपा सरकारला लगावला आहे.