रविवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तेलगीला अटक करत मोक्का लावण्याचे निर्देश मी दिले होते. पण, त्यानंतर शरद पवारांनी माझा राजीनामा घेतला, असा हल्लाबोल छगन भुजबळांनी केला होता. अशात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सूचक असं ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ काय म्हणाले?

“तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा शरद पवारांनी मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. १९९२-९३-९४ साली शरद पवारांवरही आरोप झाले होते. पण, शरद पवारांचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला?” असा सवाल भुजबळांनी पवारांना विचारला.

हेही वाचा : “पंतप्रधानांना राखी बांधली अन् ईडी थांबली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

“दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला अन्…”

जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले, “तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. सीबीआयने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी महाधिवक्ता अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली. त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितले की, याबाबत तुम्ही शरद पवार साहेबांशी चर्चा करा. शरद पवार साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली.”

हेही वाचा : “…तेव्हा फडणवीसांच्या पाया पडले”, मुश्रीफांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड प्रत्युत्तर देत म्हणाले…

“समझने वाले को इशारा काफी होता है”

“त्यानंतर दोन महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यानंतर जी ओरिजनल चार्जशीट होती, ज्यामध्ये ती नावे होती ती सगळी वगळण्यात आली होती. यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे, तो काढून घ्या. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला… तो अदृश्य हात कुणाचा… समझने वाले को इशारा काफी होता है,” असं म्हणतं आव्हाडांनी भुजबळांना लक्ष्य केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad tweet telgi chargsheet after chhagan bhujbal attacks sharad pawar ssa
Show comments