कोल्हापूर : ऊसदरप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक होऊ लागल्याने या प्रश्नावर साखर कारखानदार व चार शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक सोमवारी (९ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी बैठकीचे पत्र काढले आहे.
त्यात म्हटले आहे की, जयसिंगपूर येथे झालेल्या स्वाभिमानी ऊस परिषदेत मागील गळीत हंगामासाठी उसाला प्रति टन २०० रुपये अंतिम हप्ता व चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३७०० पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली. याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी कारखाने, शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक सोमवारी आयोजित केली आहे. बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, माजी सभापती सावकार मादनाईक, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
हेही वाचा…साखर, इथेनॉलचे दर वाढवावेत – धनंजय महाडिक
u
\
सत्ताधारी गटाचा प्रभाव
दरम्यान काल शिरोळ येथे साखर कारखानदार व आंदोलन अंकुश यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. तर कालच स्वाभिमानीला रामराम ठोकलेले माजी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांनी दरवर्षीप्रमाणे संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली होती. त्यांनी मागणी केल्यानंतर लगेचच या बैठकीचे आयोजन केले असल्याने सत्ताधारी गटाचा बैठकीवर प्रभाव जाणवत आहे