पुणे: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तकाच्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. आता हे पुस्तक हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराथी सह जर्मन भाषेतही काढण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. ” युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लंडनमध्ये राहत असलेल्या आणि तिकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे”, असं दिगंबर दराडे यांनी सांगितले.

हेही वाचा… देहू, आळंदीत वैष्णवांचा मेळा! तुकोबांच्या पालखीचे आज, माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान अशा गोष्टींमुळे ऋषी सुनक हे भारतात याआधीच चर्चेचा विषय ठरले होते.

हेही वाचा… देहू: यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे तुकोबांना साकडे

माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही एक महिन्यामध्ये पाच आवृत्त्या काढलेल्या आहेत. तरूणांची माागणी या पुस्ताला दिवसेंदिवस वाढत आहे. ऋषी सुनक यांच्या बद्दलचे मराठीतील हे पहिले असल्याने विशेष आकर्षण ठरत आहे. ऋषी आणि अक्षता मुर्तींची लव्हस्टोरी, मुर्ती कुंटुबियांचा साधेपणा लोकांना अधिकचा भावत आहे. याच बरोबर दराडे यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत लेखन केले आहें. म्हणून आम्ही हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचं काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist digambar darade book on british prime minister rishi sunak is becoming a bestseller dvr