मुंबईतल्या टीव्ही पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या हर्षल भदाणे या पत्रकाराचा धुळ्यात अपघाती ( Dhule Accident ) मृत्यू झाला. हर्षल भदाणे यांनी साम मराठी, झी चोवीस तास अशा वाहिन्यांमध्ये काम केलं. सध्या ते टाइम्स नाऊमध्ये कार्यरत होते. धुळे येथे ते त्यांच्या गावी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

नेमकी काय घडली घटना?

हर्षल भदाणे हे त्यांच्या बोरकुंड या गावी गेले होते. तिथून परतत असताना त्यांची कार गरताड गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक ( Dhule Accident ) दिली आणि कार लांबपर्यंत ओढत नेली. यावेळी हर्षल भदाणे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारायचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी ते ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कारमध्ये हर्षल भदाणे यांच्यासह बसलेले आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला व त्याचे एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत त्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Cement mixer and taxi accident on Borivali Western Expressway taxi driver died
बोरीवली येथे अपघातात खासगी टॅक्सी चालकाचा मृत्यू
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

हे पण वाचा- Worli accident : वरळीत अपघातात निष्काळजीपणामुळे मृत्यूचे कलम वाढवले

पोलिसांनी काय सांगितलं?

“गरताडे गावाजवळ एका ट्रकने तीन व्यक्तींना उडवलं. हा ट्रक चाळीसगाव चौफुलीमार्गे चालला होता. या ट्रकने धुळे शहरातील शिवाजी चौक भागातही दोन वाहनांना धडक ( Dhule Accident ) दिली होती अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. या घटनेत पत्रकार हर्षल भदाणेंचा मृत्यू झाला. तर त्यांचे दोन सहकारी जखमी झाले आहेत. ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांनीही आम्ही ताब्यात घेतलं आहे. हा ट्रक आम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात रवाना करत आहोत.” पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी हे देखील सांगितलं की ट्रकने धडक ( Dhule Accident ) दिल्यानंतर जमाव संतप्त झाला आणि त्यांनी या ट्रकच्या काचा फोडल्या. पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Dhule Accident News
मुंबईतील पत्रकार हर्षल भदाणे यांचा अपघाती मृत्यू

ज्या ट्रकच्या धडकेमुळे ( Dhule Accident ) हर्षल भदाणेंचा मृत्यू झाला त्या ट्रक ड्रायव्हरला तात्काळ अटक करुन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं या मागणी साठी TVJA चं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. TVJA परिवार हर्षल भदाणे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे असंही या संघटनेच्या सदस्यांनी स्पष्ट केलं.

हर्षल भदाणे सात वर्षांहून अधिक काळ कार्यरत

हर्षल भदाणे यांनी पत्रकारिता क्षेत्रात सात वर्षांहून अधिक काळ काम केलं. मनमिळाऊ स्वभावामुळे मुंबईतील पत्रकारांच्या वर्तुळात त्यांची चांगली ओळख होती. वृत्त निवेदक आणि पत्रकार अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी टीव्ही पत्रकारिता क्षेत्रात काम करताना सांभाळल्या. हर्षल भदाणे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. हर्षल भदाणे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. हर्षल भदाणे यांच्या जाण्याने भदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Story img Loader