संतोष मासोळे

धुळे : शहरात विकासकामे होत नसल्याची ओरड एकीकडे मनपातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह विरोधकांकडून होत असताना शहरातील विकासकामांसाठी कोणामुळे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला, यावरून एमआयएमचे आमदार फारुक शहा आणि भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. शहरातील विकासकामांना खासदार भामरे यांनीच खीळ घातल्याचा आरोप आमदार शहा यांनी केला आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
owl trapped in manja rescued
…त्याच्या नशिबी आता आजीवन बंदीवासच

भामरे आणि अग्रवाल ही जोडी वेळोवेळी शहर विकासात कसा खोडा घालत आहे, याची काही उदाहरणे शहा यांनी पत्रकारांसमोर ठेवल्याने हा वाद अधिकच वाढला आहे. ३० कोटी रुपयांच्या रस्ते कामांना भामरे आणि महापौरांसह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी स्थगिती आणल्याचा आरोप करून शहा यांनी खळबळ उडवून दिल्यावर अशी स्थगिती आपण आणली नाही. उलट अधिकचा निधी कसा मिळेल यासाठीच प्रयत्न केल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. १५० कोटी रुपये खर्चाची भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी शहरातील अनेक चांगले रस्तेही खोदावे लागले. पावसाळय़ाआधीच अनेक भागांमध्ये जेसीबीच्या साहाय्याने रस्ते खोदण्यात आल्याने विविध वसाहती आणि मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. भूमिगत गटार योजना ही शहरवासीयांसाठी होणारी दीर्घकाळासाठीची व्यवस्था असली, तरी ती पावसाळा संपल्यानंतरही निर्धारित वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.  नगरोत्थान योजनेंतर्गत खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून आणल्याचा दावा खासदार भामरे यांनी केला. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात हा निधी उपलब्ध झाला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ३० कोटी रुपये उपलब्ध झाले. हा मंजूर निधी केवळ देवपूर भागातील रस्ते दुरुस्तीसाठी देण्यात आला असताना आमदार शहा यांनी हा निधी अल्पसंख्याक भागाकडे वळविण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.  विकासकामांसाठी निधी मिळत असला तरी प्रत्यक्ष काम करताना ३० टक्के रकमेची तरतूद महापालिकेलाही करावी लागते. मात्र देवपूर भागासाठी मंजूर झालेला निधी अन्य भागांत खर्च करण्याच्या हालचाली शहा यांच्यामार्फत होत असल्याने महापालिकेने आपल्या हिश्शाची रक्कम उपलब्ध करून देण्यास आढेवेढे घेतले. एवढेच काय, शहा यांच्या सापत्नभावाच्या कार्यपद्धतीची पुराव्यासह माहिती देऊन अशा कामांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळविण्यात आली. त्यामुळे शहा भडकले. त्यामुळेच भामरे आणि मंडळींनी विकासकामांना खीळ घातल्याचा आरोप त्यांनी केला.

शहा यांच्या आरोपांनंतर एमआयएमच्या महिला आघाडीकडून भाजप आणि खासदार भामरेंच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आपण धुळय़ात विकासकामे करत आहोत, पाकिस्तानातील रस्ते दुरुस्तीचे काम नाही करत, असे खडेबोल आमदार शहा यांनी सुनावले. भाजपचे खासदार भामरे, महापौर, मनपा आयुक्तांनी मंत्रालयात जाऊन मंत्र्यांचे पाय धरले आणि या कामांना स्थगिती मिळविली, असा आरोप त्यांनी केला. आपण आमदार होण्याआधी नगरसेवकही होतो. त्यामुळे कुठले काम कसे करायला हवे आणि निधी कसा मिळवता येऊ शकतो, याचा अनुभव आहे. तसा भामरे यांना अनुभव नाही, अशी टीकाही शहा यांनी केली.

 तर ३० कोटींची कामे करून घेण्यासाठी शहा यांची टक्केवारी ठरली होती. त्यासाठी विशिष्ट ठेकेदारांना गळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खासदार भामरे  विरुद्ध आमदार शहा यांच्यातील वाद पेटता राहिला आहे.  भामरे आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी कोटय़वधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर करून घेतल्याचे सांगत येणाऱ्या वर्षांत या निधीतून शहरातील रस्ते आणि पिण्याचे पाणी यासंदर्भातील तक्रारी दूर होतील, असा दावा केला आहे. एमआयएम विरुद्ध भाजप यांच्यातील या जुगलबंदीच्या स्पर्धेतून शहर विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच धुळेकरांची अपेक्षा आहे.

आमदार शहा हे साफ खोटे बोलतात. देवपूर भागातील रस्ते दुरुस्तीसाठी ३० कोटींचा निधी मंजूर झाला हे खरं असले, तरी प्रत्यक्षात या रकमेतून दुसरीकडे कामे करण्यात येणार होती. बहुतांश निधी अल्पसंख्याक भागात खर्च करण्याचा प्रयत्न होता. 

– डॉ. सुभाष भामरे, खासदार

Story img Loader