वाई : धोम वाई खून खटल्यात संतोष पोळ याने स्वतः ज्योती मांढरेचा तब्बल साडेचार तास उलट तपास घेतला. त्यात भुलीच्या इंजेक्शन ,त्यासाठीच्या वापरात येणाऱ्या सुयां, प्रमाण याबाबत तिला बरेच उलट सुलट प्रश्न विचारले. तिने आज पर्यंत चुकीची माहिती पोलिसांना दिल्याचे मांढरेच्या उलट तपासणीत न्यायालयासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न संतोष पोळ याने केला. उलट तपास बाकी असल्याचे सांगत पुढील तारीख घेण्यात आली.

धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.जी.नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास आज पुन्हा पुढे सुरु झाला.सुनावणी साठी सरकारी वकील ॲड.उज्वल निकम हे वाई न्यायालयात आले होते. संतोष पोळ यालाही बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक न्यायालयात उपस्थित होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या खून खटल्यातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिचा उलट तपास प्रमुख आरोपी असेलेल्या संतोष पोळ घेत आहे. आज त्याने भुलीची कोणत्या कंपनीची इंजेक्शन या खून प्रकरणात वापरली होती,यासाठीच्या कोणत्या कंपनीच्या सुयांचा वापर करण्यात आला,आदी अनेक उलट सुलट प्रश्न विचारले. काही प्रश्नांना माहित असल्याचे व माहिती नसल्याचे उत्तरे दिली. भुलीची जी इंजेक्शन दिली असे सांगितले आहेस ती इंजेक्शन कितीतरी वर्षांपूर्वी बंद झाली असल्याचे तुला माहिती आहे का ,असा उलट प्रश्न ही त्याने ज्योती मांढरेला विचारला. याबाबत जास्त माहिती नसल्याचे तिने सांगितले. भुलीच्या इंजेक्शन मध्ये किती मिलीग्रॅम औषध घेतले होते याबाबत ही त्याने तिच्याकडे विचारणा केली.भुलीचे इंजेक्शन वापरण्याचे
प्रमाण किती असते. अशा आशयचे प्रश्न यावेळी ज्योतीला विचारण्यात आले.

आज सकाळच्या सत्रात न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली .ज्योती मांढरेची प्रकृती ठीक नसल्यामुळे व तिला मधुमेह असल्याने चक्कर येत असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले व त्यामुळे न्यायालयाने सकाळच्या सत्रात सुनावणी केली आणि दि. १ जुलै रोजी पुढील सुनावणी नेमली आहे. त्यादिवशी पुन्हा ज्योती मांढरे चा उलट तपास पुढे सुरू राहणार आहे. न्यायालयात सुनावणी ऐकण्यासाठी वकिलांनी गर्दी केली होती. न्यायालय परिसरात संतोष पोळला आणलेले असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Story img Loader