धाराशिव: देशात प्रचंड कोळसा साठा उपलब्ध आहे. पुढील दीडशे वर्षांपर्यंत त्यातून चांगल्या प्रतीची ऊर्जानिर्मिती होईल. तरी देखील देशात आजच्या घडीला वीजेचा आणि पाण्याचा तुटवडा का आहे? असा सवाल उपस्थित करीत तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे राज्य येण्यासाठी तुळजाभवानी देवीकडे आशीर्वाद मागीतले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या मंत्रिमंडळासह कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये दाखल झाले. त्यांचे तुळजापूरमध्ये आगमन झाल्यानंतर मंदिर समितीचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी त्यांचे स्वागत केले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर केसीआर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुळजाभवानी मंदिराचे हे क्षेत्र अत्यंत पवित्र आहे. देवीची आज्ञा असेल तरच या ठिकाणी दर्शनासाठी येण्याची संधी मिळते. आज आपणास तुळजाभवानी देवीने दर्शनाची संधी दिली. तुळजाभवानीकडे देशात सगळीकडे चांगला पाऊस पडू दे, कोणतीही नैसर्गिक आपत्ती येवू नये यासाठी साकडे घातले असल्याचे केसीआर यांनी सांगितले.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार कोणाचेही असो. त्यांनी जनतेच्या हितासाठीच काम करायला हवे. दुर्दैवाने आज राज्यातील शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळत नाही. तेलंगनामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार समाधानी आहेत. आपण केलेल्या कामामुळे ते खूष आहेत. त्यामुळे आमचा एकच नारा आहे, ‘अब की बार, किसानों की सरकार’ हा नारा घेवून आम्ही महाराष्ट्रात आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेने आजवर सर्वच राजकीय पक्षांना सत्तेची संधी दिली आहे. परंतु अपेक्षित विकास झाला नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनी ठरविल्यास तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने आमच्या पक्षाला संधी मिळावी. त्यातून शेतकर्‍यांचे राज्य या ठिकाणी अवतरेल, अशी ग्वाही केसीआर यांनी यावेळी दिली.
मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री केसीआर यांचा देवीची प्रतिमा, शाल, फेटा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिराचे व्यवस्थापक संतोष पाटील, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, बीआरएसचे प्रशांत नवगिरे यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

२० दिवसात ३५ लाख सदस्यांचे उद्दिष्ट

मागील १० दिवसांत महाराष्ट्रात बीआरएसचे ११ लाख सदस्य झाले आहेत. पुढील २० दिवसांत ३५ लाख सदस्य होतील. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. वीज, पाणी आदींचा अपुरा पुरवठा होत आहे. राष्ट्रीय जलनीती व ऊर्जा नीतिमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे अत्यावश्यक असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगितले.