तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी १००हून जास्त आमदार आणि शेकडो गाड्या आणून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून केली जात आहे. केसीआर यांनी आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर खोचक शब्दांत टीका केली.

“गेल्या काही दिवसांत एक गोष्ट मला खटकते. आज देशाचं ध्येय काय आहे? काही आहे की विना ध्येयाचेच आपण भटकत आहोत? काय चाललंय या देशात? प्रत्येक भारतीयानं यावर विचार करायला हवा. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षं उलटली. ७५ वर्षं हा काही कमी काळ नाहीये”, असं के चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sanjay Shirsat On Mahayuti Election Seats
Sanjay Shirsat : “भाजपा मोठा पक्ष, त्यांना तडजोड…”, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
BJP worried about defection before Legislative Assembly seat allocation in Maharashtra
महाराष्ट्रात जागावाटपापूर्वी भाजपला पक्षांतराची चिंता? २३ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये नाराजी का?
Eknath Khadse is waiting for response from BJP
भाजपकडून प्रतिसादाची खडसे यांना प्रतीक्षा
Sharad Pawar and Devendra Fadnavis
Harshvardhan Patil : देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचा धक्का? निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ भाजपा नेता तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना उधाण
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”

“मला महाराष्ट्रातला एक पक्ष सांगा ज्याला…”

“निवडणुका होत असतात. कुणी ना कुणी जिंकतच असतं. किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मला एक पक्ष सांगा ज्यांना राज्य करण्याची संधी मिळाली नाही. काँग्रेसनं ५० वर्षं राज्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाला तुम्ही संधी दिली. करायचं असतं, तर यापैकी कुणीतरी एकानं तरी काम केलं असतं. तेलंगणासारख्या नव्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्र तर एक मोठं, श्रीमंत राज्य आहे. इथे काय कमी आहे?”, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला आहे.

इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल – केसीआर

“हे सगळे एवढंच सांगतायत की महाराष्ट्रात तेलंगणासारख्या योजना राबवस्या तर महाराष्ट्राचं दिवाळं निघेल. होय, इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल. आम्ही कुठून आणतोय पैसे? सगळे उलट-सुलट सांगतायत. विचित्र काहीतरी बोललं जातंय”, असं KCR यावेळी म्हणाले.

“इथले राजकारणी मला म्हणतायत इथे या, दर्शन घ्या, पण राजकारण करू नका. मला एक कळत नाहीये, आम्ही आत्ता कुठे महाराष्ट्रात सुरूवात केली आहे. पण या सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? एवढ्या छोट्या पक्षासाठी एवढा गोंधळ का घालताय? कोणताच पक्ष आम्हाला सोडत नाहीये. भाजपा, काँग्रेस बोलतायत. काँग्रेसनं आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं. भाजपानं आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटलं. या टीम कुठून येतायत? आम्ही शेतकरी, मागास वर्गाची टीम आहोत. बीआरएस हा एकमेव पक्ष आहे ज्यानं घोषणा केली अब की बार, किसान की सरकार. आता या लोकांना भीती वाटत आहे. शेतकरी बीआरएसशी जोडले जातायत म्हणून हे सगळं बोलतायत. बीआरएस ही फक्त तेलंगणा किंवा महाराष्ट्रापर्यंत मर्यादित पार्टी नाही”, अशा शब्दांत केसीआर यांनी राज्यातील सर्वपक्षीयांना टोला लगावला.

“..तर देशातल्या प्रत्येक एकर शेतीला भरपूर पाणी मिळेल”

“भारतात ४१ कोटी एकर शेतीयोग्य जमीन आहे. आपल्याकडे १ लाख ४० हजार टीएमसी पाणी देईल इतका पाऊस पडतो. त्यातल्या निम्म्या पाण्याची वाफ होते. पण निम्मं पाणी आपल्याला वापरायला उपयोगी आहे. त्यामुळे योग्य नियोजन केलं, तर प्रत्येक एकरमध्ये भरपूर पाणी देता येईल”, असंही केसीआर यांनी यावेळी नमूद केलं.

Video: “बोला, वारंवार खोटं बोला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत ‘आप’चा टोला!

“इथल्या सरकारमध्ये दम नाहीये का?”

“महाराष्ट्रात उसाच्या भावासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना का लढा द्यावा लागतो? काय कमी आहे? या समस्येवर एका वर्षात चर्चा करून कायमचा तोडगा काढण्याइतकाही दम या सरकारमध्ये नाहीये का? शेतकऱ्यांचं सरकार आलं, तर हे अगदी सहज होईल. शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हेच चालत राहील”, असंही चंद्रशेखर राव यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.