वाई:जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पठारावरील हंगामाची सुरुवात रविवार ( दि ३ सप्टेंबर)पासून होणार आहे.  कास  पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार आहे.सुरवातीला काही दिवस सर्वांना निशुल्क प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे हंगाम पर्यटकांना खुला करण्याच्या हलाचालींना वेग आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पनवेलमध्ये १०२ वर्षांपासून तालवाद्यांची हाताने निर्मिती करणारे ‘पुणेकर’

कास – पठारावर  बाल्यावस्थेत असणाऱ्या फुलांच्या प्रजातींची उगवण चांगली झाली असून पठार हिरवेगार दिसत आहे. कास पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुल ही दिसू लागले आहे. पाऊस कमी होवून उन्हाची ताप पडली असल्याने विविधरंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात झाली आहे.  

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उमलणारी फुले ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हळू हळू दिसू लागली असून काही दिवसातच हा संपूर्ण परिसर हा विविध फुलांच्या छटांनी बहरलेला दिसेल आणि या परिसराला पर्यटकांची गर्दी होईल.

हेही वाचा >>> ‘गोकुळ’ बाबत शौमिका महाडिक दूध उत्पादकांची दिशाभूल करत आहेत – अरुण डोंगळे

रविवार (दि ३) सप्टेंबर पासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत  हंगामाचा शुभारंभ केला जाणार आहे.यावर्षीच्या हंगामासाठी १२० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. जागतिक वारसा स्थळावर असणाऱ्या कास पठारावर सद्या हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस ,दाट धुके,  व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे. हळू पर्यटकांची गर्दी ही वाढू लागली असून पर्यटक निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत.