सांगली येथील तरुण एकता मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सोमवारी जिल्हा पुरुष व महिला संघ रवाना झाला.
या वेळी यशवंत व्यायामशाळेच्या पटांगणावर आयोजित समारंभात नाशिक मर्चन्ट को-ऑपरेटिव्ह बँक आणि चॅलेंज स्पोर्ट्स यांच्यातर्फे जिल्हा संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष आ. जयंत जाधव, मर्चन्ट बँकेचे अध्यक्ष प्रकाश दायमा, प्रशांत भाबड, मनमाडचे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिल्हा संघटनेतर्फे कर्णधार विक्रांत मांगडे व सारिका जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader