विश्वास पवार

वाई : पांडे (ता वाई) गावची काळभैरनाथाच्या उभ्याच्या नवरात्राची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. उभ्याचे नवरात्र म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करणे. पुणे- बंगळूर महामार्गावर बोपेगाव पासून चार किलोमीटर अंतरावरील पांडे गावचा साडेतीनशे उंबरठा व सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे. भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

काळभैरवनाथाला ज्यांनी नवस केला आहे, असे ग्रामस्थ उभ्याचे नवरात्र पाळतात. या काळात नऊ दिवस जमिनीवर बसायचं नाही. पायात चप्पल घालायची नाही, गावची वेश ओलांडायची नाही. आजारी पडलं तरी गोळ्या खायच्या नाहीत. तिखट मीठ खायचं नाही. जे काही करायचं ते जमिनीवरच उभं राहूनच. प्रत्येकाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असतात, झोप आल्यास जमिनीवर झोपायचं नाही. मंदिरात दोरीने टांगलेल्या झोपाळ्यावर छातीपर्यंतचा भाग टेकवून डुलकी घ्यायची, यावेळी मात्र एक पाय जमिनीवरच ठेवावायचा. दुपारच्या वेळी घरी फराळासाठी गेले, तरी फराळ उभ्यानेच करायचा मात्र लगेच मुक्कामाला मंदिरात यायचे अशी कडक शिस्त आहे. फराळात फळे व तिखट- मीठ एकत्र नसलेल्या पदार्थांचा समावेश असतो.

आणखी वाचा-कुपवाडमध्ये कासव तस्करी प्रकरणी तरुणास अटक

व्रताच्या स्मरणासाठी व आधारासाठी काठीचा आधार घायचा. अडीच हजार लोकवस्तीच्या गावात घरटी एकाचा तरी उपवास असतो. नवरात्रात लहानापासून मोठ्या पर्यंत प्रत्येक जण या नियमांचं पालन करतो. व्रत करणाऱ्यांचे नऊ दिवस जास्तीत जास्त वेळ पाय जमिनीवर असले पाहिजेत. पळायचं नाही, उडी मारायची नाही. दुचाकीवर किंवा बसमध्ये बसायचं नाही. देवाची वेश तीच गावची वेश ती ओलांडायची नाही हा मात्र कडक नियम. नऊ दिवस गावात नारळ फोडला जात नाही. सकाळी शिंग वाजताच गाव एकत्र येतं, पूजा आरती होते. पालखीची गाव प्रदक्षिणा होते. नवरात्र सुरु होण्यापूर्वी गाव एकत्र येते, गावाचा परिसर स्वच्छ केला जातो. महिलाही उपवास करतात, पण त्या घरी. मात्र त्यांना मंदिरातील नियम लागू नाहीत. आत्ताच्या विज्ञान युगात अशा काही गोष्टी खटकतात, मात्र यामुळे संस्कृती तर जपलीच जाते आणि परंपरा आणि लोकभावना जपून त्यांचा आदरही राखला जातो.

आणखी वाचा-दुष्काळी स्थितीत ‘मनरेगा’चाच आधार

उत्सव काळात रात्री भजन, कीर्तन, गोंधळ, वाघ्या मुरळी असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अष्टमीला देवाचा जागर होतो. नवमीच्या दिवशी देवापुढे कौल लावून पुढील नवस बोलले जातात. विजयादशमीला देवापुढे कौल लावून सीमोल्लंघनाची दिशा ठरविली जाते. त्या दिशेकडील गावच्या हद्दीवर जाऊन भाविक सोने लुटतात. या वेळी गावातील आबालवृद्ध, महिला व सर्व जातीधर्मातील लोक या उत्सवात सहभागी होतात.