वाई: मांढरदेव येथील काळुबाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम आज गुरुवार( दि २१)पासून सुरु करण्यात आल्याने गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही, असे समितीकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराचे गर्भगृह आठ दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे.
मांढरदेव येथील काळुबाई मंदिर बंद असलेल्या कालावधीत ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही असे समितीकडून कळवण्यात आले आहे. या काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय नको, म्हणून प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी येथील सभामंडपात उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांची पूर्ण निराशा होणार नाही.
आणखी वाचा-मॉन्सूनच्या परतीच्या पावसाला ‘दसऱ्या’चे वेध, मुहूर्त यंदाही लांबणीवर
गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार असल्याचे मंदिर समितीने कळवले आहे.दि२१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत भाविकांना मात्र बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही, असे समितीकडून कळवण्यात आले आहे.