भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी केलेल्या भाषणात भाजपावर सडकून टीका केली. कन्हैय्या कुमार म्हणाले, आपल्याला आपला देश आणि स्वातंत्र्य टिकवायचं आहे. काँग्रेस त्यात आघाडीवर असेल. ते लोक (भारतीय जनता पार्टी) तुम्हाला इकडच्या-तिकडच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतील परंतु, तुम्ही ठाम राहा असा सल्ला कन्हैय्या कुमार यांनी यावेळी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्हैय्या कुमार म्हणाले, ते (भाजपा) खोटा इतिहास तुमच्यासमोर ठेवतील. परंतु, तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा. तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येत असेल, अब्दुलला ११ भाऊ-बहीण आहेत. देशात मुस्लिमांची संख्या वाढली तर भारतातली लोकशाही, संविधान समाप्त होईल आणि शरिया कायदा लागू होईल.असे मेसेज आपल्याला का येतात? ही भिती का पसरवली जातेय? कारण तुम्ही या गोष्टी सोडून इतर गोष्टींचा विचार करू नये.

काँग्रेस नेते म्हणाले, अंबानींच्या एका दिवसाच्या पगारातून ७५ लाख मनरेगा मजुरांना वेतन देता येईल, हा विचार तुम्ही करू नये, म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. तुम्ही विचार करू नये की अदानीच्या सेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे आहेत? तुम्हाला समजू नये की देशातील ९९ टक्के कंत्राटं ही एकाच कुटुंबाला दिली जात आहेत, म्हणूनच ही सगळी भिती पसरवली जात आहे.

हे ही वाचा >> दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची नाशकात गुप्त भेट? जयंत पाटील म्हणाले, “सगळीच माणसं आपल्या…”

कन्हैय्या कुमार म्हणाले, हे लोक (भाजपा) घराणेशाहीवर बोलत आहेत. परंतु, घराणेशाही त्यांच्याकडे असली तर ती योग्य असते आणि पलिकडे (विरोधक) असेल तर ती चुकीची ठरते. अजित पवार महाविकास आघाडीत होते तेव्हा भ्रष्टाचारी होते. तेव्हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर ७५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. मग ते भाजपाला जाऊन मिळाले. अजित पवार भाजपात गेल्यावर ईडी (सक्तवसुली संचालनालय) झोपेची गोळी खाऊन झोपली. अजित पवारांच्या घरचा पत्तादेखील विसरली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanhaiya kumar slams ajit pawar and bjp over corruption and familism asc