माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर सोमवारी (१४ ऑगस्ट) ते क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडले. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली होती. तब्बल १७ महिन्यांपासून नवाब मलिक ईडीच्या तुरुंगात होते. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर दीड वर्षांनी नवाब मलिक यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारपासूनच रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील अनेक नेते सोमवारपासून नवाब मलिक यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत आहेत. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी आज नवाब मलिक यांची भेट घेतली. तर शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीदेखील नवाब मलिक यांची भेट घेतली.

हे ही वाचा >> शिंदे गटाची सत्ता असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजित पवारांचं अतिक्रमण? मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “साताऱ्यात…”

दरम्यान, नवाब मलिक यांचे बंधू आणि माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना नवाब मलिक यांच्या तब्येतीची माहिती दिली. कप्तान मलिक यांनी सांगितलं की नवाब मलिक यांचं गेल्या दीड वर्षात २५ ते ३० किलो वजन घटलं आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. किडणी तज्ज्ञाची भेट घेऊन आम्ही यावर चर्चा करणार आहोत. तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे पुढील उपचार केले जातील. आमच्यावर देवाची कृपा झाली आणि दोन महिन्यांसाठी का असेना आमचा भाऊ घरी परतला आहे. नवाबभाई हे माझ्यासाठी वडिलांसमान आहेत. वडील गेल्यावर त्यांनीच आम्हाला वडिलांप्रमाणे प्रेम दिलं आहे.