कराड : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आवाजाच्या भिंतीचे मालक (डॉल्बीधारक) तसेच गणेशोत्सव मंडळांवर कराड पोलीस उपअधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत चार डॉल्बीधारक चालक- मालक तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी डॉल्बी यंत्रणा जप्त केली असल्याने गणेशोत्सव मंडळे, डॉल्बी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा >>> सांगलीत बेकायदा फलक, अतिक्रमणाविरुद्ध मोहीम

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
sand mafias are illegally extracting sand from ujani dam
उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस
nagpur leopard latest news in marathi
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…

पोलिसांच्या माहितीनुसार शुक्रवारी व शनिवारी (६ आणि ७ सप्टेंबर) गणेश आगमण मिरवणुकीदरम्यान, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी ध्वनिप्रदूषण पथके तयार केली होती. दरम्यान, स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश आगमन व विसर्जनदरम्यान डॉल्बी लावणाऱ्या संबंधित मंडळांवर, तसेच डॉल्बीचालक व मालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सुनावले होते.

परंतु, गणेश आगमण मिरवणुकीवेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बीधारक चालक व मालक, तसेच गणेशोत्सव मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वनिप्रदूषण पथकाने आजपर्यंत सदरच्या नियमांचे व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या एक लेजर लाईट लावलेल्या वाहनावर तसेच चार डॉल्बीधारक चालक व मालक, गणेशोत्सव मंडळांवरही कारवाई करून डॉल्बीची यंत्रणा जप्त केली असून, अशी कारवाई कायम राहणार असल्याने गणेश मंडळांनी व डॉल्बी चालक, मालकांनी ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे. अन्यथा, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader