कर्जत : वंचित बहुजन आघाडी या पक्षाची जिल्हा तालुका युवा कार्यकारणी निवडीसाठी विश्रामगृह कर्जत येथे मुलाखती संपन्न झाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या कर्जत तालुक्यातील किंवा कार्यकारणीच्या पदाधिकारी निवडीसाठी येथील विश्रामगृह येथे चांगदेव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखती संपन्न झाल्या. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलूमे ,जिल्हा महासचिव संजय शेलार, जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाने व लखन पारसे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलूमे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ऍड प्रकाशजी आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी, पक्ष बळकट करण्यासाठी ,वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशानुसार आजची ही बैठक बोलवण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदग्रहण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या आगामी निवडणुका संदर्भात तयारी करावी.यासाठी आपापल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गन निहाय पक्षाची बांधणी करावी. अशी सांगून श्री भैलुमे म्हणाले की, पक्षात निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला पदापासून वंचित ठेवले जाणार नाही.पक्षातील ज्येष्ठांना मान सन्मान देत प्रोटोकॉल पाळत असणाऱ्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पुढील काळात समन्वय साधुन पार्टीत काम करण्याची संधी देवु असे श्री भैलूमे म्हणाले. उपस्थित इच्छुक असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.जिल्हा नुतन महीला कमिटी बाबत, तालुका महीला कमिटी बाबत वंचित युवा ची बांधणी करण्यासाठी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना सुचना करण्यात आल्या. वंचित बहुजन युवा आघाडीची प्रत्येक गावात शाखा बांधण्यासाठी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
यावेळी धालवडी गावचे नवनिर्वाचित सरपंच पदी तात्यासाहेब चव्हाण यांची निवड झाली या मुळे त्यांचा दादा समुद्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सदस्य पोपट थोरात, दादा समुद्र , उत्तम झेंडे पाटील , वंचित युवा च्या महिला तालुका अध्यक्षा रुपाली आढाव वंचित युवा च्या महिला जिल्हा समन्वय ललिता पवार , वंचित युवाच्या तालुका समन्वय सुनिता काळे यांच्यासह अनेकांनी यावेळी मार्गदर्शन केले. अमोल गंगावणे, वंचित युवा च्या जिल्हा समन्वय ललिता पवार,महीला तालुका अध्यक्षा रूपाली आढाव, तालुका महीला समन्वय सुनिता काळे, दत्ता भालेराव, राजेंद्र गायकवाड, अशोक चव्हाण, अक्षय ससाने, महादेव भोसले, करण ओहोळ, विकास समुद्र, मय्युर ओव्हळ,गणेश केंदळे, ज्ञानदेव आढाव, श्रीराम चव्हाण, तात्यासाहेब चव्हाण, सागर पवार,विजय भोसले, निलेश काळे, अविनाश काळे,राहुल अडसूळ, राहुल पोळ,नाना वाघ, तुषार माने, कैलास शेलार, कुलदीप शेलार, कपिल गंगावणे, रवींद्र सोनवणे, चेतन गायकवाड. इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी विविध पदांसाठी यावेळी मुलाखती दिल्या.