कर्जत : महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषद व आमदार रोहित पवार तुमच्या पुढाकारामधून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरचा वेताळ शेळके हा ६६ वा महाराष्ट्र केसरी झाला. अंतिम लढतीमध्ये त्याने मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील सात विरुद्ध एक गुणांनी पराभव केला. यावेळी समर्थकांनी मोठा जल्लोष केला. शरद पवार यांच्या हस्ते वेताळ शेळके याला मानाची महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा देण्यात आली. यावेळी, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार नामदेव मोहिते, खासदार निलेश लंके व हजारो प्रेक्षक उपस्थित होते.
अंतिम लढतीमध्ये पृथ्वीराज पाटील पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ शेळके यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पृथ्वीराज पाटील यांनी मैदानाला एक फेरी मारली आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खिलाडू वृत्तीच एक अनोखे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला केले.
कर्जत येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सुंदर असे स्टेडियम रोहित पवार यांनी उभे केले होते. अंतिम लढतीसह सर्व कुस्त्या अतिशय शांततेने यामुळे या ठिकाणी संपन्न झाल्या. प्रत्येक महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीला वादाची गालबोट लागलेले असताना यावेळी मात्र पंचांनी देखील अतिशय पारदर्शक काम यावेळी या ठिकाणी केल्यामुळे कुठल्याच निकालाविषयी आक्षेप मल्लांना घेता आला नाही हे या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके
माझं लहानपणापासून महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न होते. ते यावेळी पूर्ण झाल्यामुळे खूप आनंद झाला. या विजेतेपदासाठी मोठी तयारी केली होती. आणि विशेष म्हणजे यावेळी पृथ्वीराज पाटील याचे आव्हान या स्पर्धेमध्ये होते. त्यांनी खूप तयारी चांगली केली होती. यामुळे त्याला पराभूत करणे हे आव्हान होते मात्र २०२२ मध्ये एका स्पर्धेमध्ये त्याला मी पराभूत केल्यामुळे माझ्या मनामध्ये आत्मविश्वास मोठा होता आणि त्यावरच मी हा विजय मिळवला आहे. माझा विजय काकासाहेब पवार व माझे प्रशिक्षक यांना व आई-वडिलांना समर्पित करतो. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही देशातील मानाची कुस्ती स्पर्धा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र कुस्ती परिषद व कुस्ती संघ यांच्या मधील वादामुळे यावेळी च महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच गाजली. फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत वादामुळे चांगलीच गाजली आणि कुस्ती परिषदेने दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचे ठरवले. आणि त्याची यजमानपद रोहित पवार यांनी स्वीकारले होते.
मानाची गदा कोण पटकावणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र केसरीची ही किताबी लढत सोलापूरचा वेताळ शेळके व मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाली. दोघेही अनुभवी व ताकतीचे पैलवान होते. दोघांचीही तयारी अतिशय जोराची होती. सुरुवातीच्या पहिल्या एक मिनिटांमध्येच पृथ्वीराज पाटील यांनी एकेरी पट काढून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र वेताळ शेळके यांनी भक्कम बचाव केल्यामुळे त्याचा तो प्रयत्न फसला. यानंतर वेताळ शेळके यांनी गुडघ्यामध्ये बसून पृथ्वीराज पाटील येथील पट काढायचा प्रयत्न फसला. यानंतर दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटील यांनी केला पण तो यशस्वी झाला नाही. मात्र नकारात्मक कुस्ती केल्याबद्दल वेताळ शेळकेच्या विरोधात पृथ्वीराज पाटील याला पहिला गुण पंचांनी दिला. कुस्ती सुरू होऊन तीन मिनिट झाले असताना पंचांनी कुस्ती सोडवली त्यावेळी पृथ्वीराज पाटील याचे दुर्लक्ष झाले आणि ती संधी साधत विकास शेळके यांनी थ्रो केला आणि पंचांनी त्याला दोन गुण दिले. मात्र त्यावेळी प्रशिक्षकांनी चार गुणांची मागणी करत निर्णयावर अक्षय नोंदवला. यानंतर तिसऱ्या पंचाकडे निर्णय देऊन त्यांनी रिप्ले पाहून चार गुण वेताळ शेळके यास दिले. यानंतर पहिला हाफ संपण्याच्या वेळी पृथ्वीराज पाटील यांनी चढाई केली मात्र पंचांनी वेळ संपण्याची शिट्टी वाजवली यामुळे पृथ्वीराज पाटील यास गुण दिले नाही यावर त्यांनी तिसऱ्या पंचाकडे अपील केले मात्र ते अपील रिप्ले पाहून फेटाळण्यात आले. यानंतर गुण मिळवण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांनी अनेक वेळा प्रयत्न केला चढाई केली मात्र तितकाच भक्कम बचाव वेताळ शेळके याचा असल्यामुळे अखेर वेताळ शेळके यांनी बाजी मारली.
तत्पूर्वी झालेल्या गादी विभागातील उपांत्य फेरीमध्ये नांदेड चा शिवराज राक्षे याचा मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांनी मोळी दावावर चितपट करून पराभव केला. या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे पायाला मार लागल्यामुळे जखमी झाला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माती विभागामध्ये सोलापूरचा वेताळ शेळके आणि अकोला येथील प्रशांत जगताप यांच्यामध्ये झाली. सुरुवातीला काही सेकंद खडाखडी झाली. यावेळी वेताळ शेळके अतिशय आक्रमक झाला होता त्याने जगताप याच्यावर चढायचा करत पहिल्या वीस सेकंदामध्ये दोन गुण मिळवले. त्यानंतर पुन्हा जगताप मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे एक गुण शेळके यास मिळाला. आणि भारत टाकत शेळके याने जगताप याला पराभूत केले.