महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन उमेदवार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. बेळगाव, कारवार, निपाणीचा समावेश महाराष्ट्रात झालाच पाहिजे, या मागणीला या दोन उमेदवारांच्या विजयामुळे पुन्हा बळ मिळणार आहे. कर्नाटकातील दक्षिण बेळगाव मतदारसंघातून समितीचे संभाजी पाटील विजयी झाले. त्याचबरोबर खानापूर मतदारसंघातून अरविंद पाटील विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीने पाच मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोन ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आले. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.

Story img Loader