बेळगावमध्ये शनिवारपासून सुरू होणाऱया अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९५व्या नाट्यसंमेलनात कर्नाटक पोलिसांनी २० जाचक अटी घातल्या आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोणताही ठराव मांडता येणार नाही. इतकेच नाही तर, या अटींनुसार नाट्यसंमेलनात सीमाप्रश्नाबाबत देखावा, नाटक, स्फुट आणि राजकीय-सामाजिक भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारचे भाष्य करता येणार नाही. या अटींमुळे पुन्हा एकदा भाषिक अस्मितेचा मुद्दा पेटण्याची दाट शक्यता आहे.
याआधी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या विधानाने याधीच बेळगाव नाट्यसंमेलनाबाबत वादाची ठिणगी पडली होती. रंगभूमीवर राजकीय मुद्दे नकोत, असे ठाम मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले होते. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाट्यसंमेलनाच्या उदघाटनाला उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा