राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून कार्तिकी यात्रेसाठी जवळपास पाच लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. मंदिर परिसर, वाळवंट, चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. टाळ-मृदुंग आणि हरीनामाच्या जयघोषाने अवघे पंढरपूर दुमदुमून निघाली आहे.

वारकरी संप्रदायात कार्तिकी वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशीस निद्रिस्थ झालेले विठठल भगवंत कार्तिकी एकादशीस उठतात आणि भक्तांची सेवा करतात. याचसाठी आषाढीनंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकीकडे पाहिले जाते. या वारीला मुंबई, कोकण, मराठवाडा येथून भाविक न चुकता येतो. यंदाच्या वर्षी राज्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीत भाविकांची संख्या कमी होणार का ? असा सवाल प्रशासनाला पडला होता. यंदा एसटी महामंडळाने राज्यातून जवळपास १२०० जादा गाड्या सोडल्या आहेत. तर रेल्वे प्रशासनाने ६ विशेष रेल्वे यात्रा कालावधीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दशमीला पंढरीत जवळपास पाच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष प्रयत्न केले आहे. आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रेसाठी श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत ३ दिवस अन्नदान समिती करणार आहे. वेफर्स, तांदळाची खिचडी आणि एकादशीला साबुदाण्याच्या खिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. याच बरोबरीने दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच मोफत चहा वाटप केले जात आहे. या शिवाय मंदिर परिसरात २४ तास अद्यावत वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलदगतीने दर्शन व्हावे, या करिता आमचे प्रयत्न आहेत असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत २ लाख भाविक मुक्कामी आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय ,वीज, वैद्यकीय पथक नेमले आहेत. या शिवाय शहरात स्वच्छतेसाठी विशेष मोहीम पालिका राबवीत असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीस विठठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्यांचे महसूलमंत्री चंद्रकात पाटील पंढरपूरात येउन दाखल झाले आहेत. सोमवारी पहाटे एकादशीच्या महापूजेनंतर सोहळयाला सुरूवात होईल. दिवसभर हरिनामांचा गजर, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान केले जाणर आहे. श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत म्हणजे मंदिरापासून ६ किमी दूर पर्यंत पोहोचली आहे. यंदा दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळाल्या असून आम्हाला दर्शनाला साडेनऊ तास लागले, असे सिंधुदुर्ग येथील एका महिला भाविकांनी सांगितले.