बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या. मात्र आता त्यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.२५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची कोर्टाकडून सुटका करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकारामुळे मोठी चलबिचल पाहायला मिळाली.

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा काल रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या.

Story img Loader