करुणा शर्मा यांनी २२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते रद्द करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती करूणा शर्मा यांनी दिली. तसेच आगामी काळात बीड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी उमेदवार उभे करणार आहे. धनंजय मुंडे यांनी मला पराभूत करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना दिले. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “आता घटनेत बदल करायचा का?” अजित पवारांच्या ‘त्या’ मागणीवरून मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी सदिच्छा भेट घेतली. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. मला अगोदर १६ दिवसांसाठी आणि नंतर ४१ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. एकनाथ शिंदे यांना मी माझ्या अडचणी सांगितल्या. माझ्यावर दवाब टाकण्यात येतोय. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे. माझ्या आईने जशी आत्महत्या केली होती, तशाच पद्धतीने मी आत्महत्या करावी यासाठी मला प्रवृत्त केले जात आहे. मात्र मी घाबरत नाही. मी लढत राहीन,” असे करुणा शर्मा म्हणाल्या.

हेही वाचा >>> “त्यांनी लाज लज्जा सगळं सोडलं,” बंडखोरांवर उद्धव ठाकरेंनी डागली तोफ, म्हणाले “निष्ठेचा झरा…”

“माझ्यावर अॅट्रॉसिटीच्या दोन खोट्या केसेस करण्यात आल्या आहेत. या केसेस मागे घ्याव्यात अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यावर आपण योग्य तो निर्णय घेऊया, असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. मला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात असून ५० कोटी रुपयांचे प्रलोभन देण्यात आले होते. भारत देश सोडला तर ५० कोटी रुपये दिले जातील, असे मला सांगण्यात आले होते,” असा गौप्यस्फोटही करुणा शर्मा यांनी केला.

हेही वाचा >>> विरोधकांच्या “ताट वाटी चलो गुवाहाटी”ला एकनाथ शिंदेंचे जशास तसे उत्तर, सभागृहात पिकला हशा

“मी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लढवली. मात्र यावेळी माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझे व्हिडीओ तयार केले जात आहेत. एडिटिंग सुरू आहे, असे मला सांगितले जात आहे. बीड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी ६० उमेदवार उभे करणार आहे. धनंजय मुंडे यांनी मला पराभूत करून दाखवावे,” असे आव्हानही त्यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karuna sharma meets eknath shinde challenges dhananjay munde prd