Karuna Sharma : महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येते आहे त्याप्रमाणे दिवसागणिक निवडणुकीत काय होणार ? याची उत्सुकता वाढते आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंंबरला निकाल लागणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल. मात्र तोपर्यंत अर्ज भरण्याची लगबग, कुठे बंडखोरी, कुठे तिकिट कापलं गेल्याने नाराजी, रडारड हे सगळं पाहण्यास मिळतं आहे. करुणा शर्मा ( Karuna Sharma ) यांनाही अश्रू अनावर झाले कारण त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख राक्षस असा करत आपलं म्हणणं इन्स्टाग्रामवर मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे त्यामुळेच..

महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता. असं करुणा शर्मा ( Karuna Sharma ) म्हणाल्या

धनंजय मुंडेंना म्हणाल्या राक्षस

तो राक्षस आहे. मी २६ वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस.इतिहास याचा साक्षीदार आहे. असंही करुणा शर्मा ( Karuna Sharma ) म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा- “मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातंय” करुणा शर्मांचा गंभीर आरोप

मी लढणार होते पण माझा अर्ज बाद ठरवण्यात आला

माझ्यामागे पक्षाचं बळ नाही. पैशांचं बळ नाही तरीही मी लढणार होते कारण माझा जनतेवर विश्वास होता. त्यामुळे मी परळी आणि बीडमधून अर्ज भरला होता असंही करुणा शर्मा म्हणाल्या आहेत. करुणा शर्मा ( Karuna Sharma ) यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला ज्यात त्या रडताना आणि धनंजय मुंडेंवर आरोप करताना दिसत आहेत.

O

धनंजय मुंडे यांनी २०२१ मध्ये काय म्हटलं होतं?

करुणा शर्मा यांच्यासह माझे २००३ पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत, अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी दिली होती. त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली होती. करुणा शर्मांपासून जी अपत्यं आहेत त्यांना आपण आपलं नाव दिलं आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले होते. मात्र करुणा शर्मा या सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप करताना दिसत आहेत. २०२२ मध्येही त्यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले होते. तर परळी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांचा अर्ज बाद झाला आहे. ज्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना राक्षस म्हणत त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karuna sharma said that monster invalidate my nomination form for election allegations on dhananjay munde scj