भाजपाने आतापर्यंत वापरा आणि फेकून द्या, असेच धोरण राबवले आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांचा वापर केला, पण उमेदवारी दिली नाही, तर गंभीर आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना दुर्दैवाने प्रचारात उतरविले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी काल केली. कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदारांना संबोधित केले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही गिरीश बापट या व्यक्तीला ओळखतच नाही. गिरीश बापट हे भाजपाचे असे नेते आहेत, ज्यांनी अगदी खालपासून वरपर्यंत भाजपा तयार केली आहे. भाजपासाठी त्यांनी आपलं जीवन दिलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघाची निवडणूक होत असताना, ते घरी बसू कसे शकतात? ” झी चोवीस तासने ब्लॅक अँड व्हाईट ही मुलाखत घेतली, यामध्ये ते बोलत होते.
हेही वाचा – “आमच्यावर कृष्णाकाठी प्रायश्चित करण्याची वेळ…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कसब्यातून अजितदादांना टोला
याशिवाय “ते का आले आम्ही सांगतो आम्ही त्यांना या म्हटलो नाही. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. ते मला म्हणाले की हे काय सुरू आहे, हे सगळे विरोधक असं पसरवत आहेत की मी आपल्या उमेदवाराच्या विरोधात आहे, मी प्रचारात येणार नाही. असं ते पसरवत आहेत हे मला खपणार नाही. त्यामुळे मी यासंदर्भात सभा घेणार आहे, मी त्यांना म्हणालो भाऊ तुम्ही सभा घेऊ नका. तुम्ही एक पत्रक काढा, पण या विरोधकांच्या वक्तव्यांमुळे ते इतके व्यथित होते, की मी गेल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं की आज मी सभा करणार आहे आणि ते गेले व बोलले.” असंही फडणवीसींना सांगितलं.
याचबरोबर “खरं म्हणजे त्यांना का प्रचारात उतरवलं?, त्यांना प्रचारात उतरावलं याचा पूर्ण दोष विरोधकांचा आहे. त्यांना(विरोधकांना) ही लाज वाटली नाही की गिरीश बापट आजारी आहेत. त्यांच्या नावाने अफवा पसरवू नये. ते आजारी आहेत तर अशाप्रकारे त्यांना लक्ष्य करू नये. उद्धव ठाकरे आणि प्रत्येकाने गिरीश बापटांना लक्ष्य केलं. अतिशय वाईट पद्धतीने लक्ष्य केलं, शेवटी न राहून देशभक्त आणि पक्षभक्त असलेले गिरीश बापट हे मैदानात उतरले.” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.