Kasba, Chinchwad Bypolls: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. कसबा मतदारसंघात भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे धंगेकर यांच्यात चुरस आहे. चिंचवड मतदार संघामध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या तिरंगी लढत आहे. मात्र आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात पुणेकर मतदानाला बाहेर पडलेले दिसले. त्यावरुन माध्यमांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर मिश्किल टिप्पणी करताना ते म्हणाले, “आज रविवार असल्यामुळे पुण्याच्या पद्धतीने मतदान होईल. पुणेकर थोड्या वेळाने मतदानाला उतरतील आणि पुणेकर एकदा उतरले तर लांब रांगा लागल्याशिवाय दिसणार नाहीत.”

पराभवाची भीती असल्यामुळेच वाद घातले जातायत

प्रचाराच्या दरम्यान ज्याप्रकारचा उत्साह चिंचवड आणि कसब्यात दिसला होता. त्यावरुन पुणेकर घरी बसतील, असे वाटत नाही. कसबा आणि चिंचवडमध्ये संध्याकाळपर्यंत चांगले मतदान होईल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली. तसेच दोन्ही मतदारसंघात काही ठिकाणी वाद आणि भांडण दिसून आले. यावर बोलत असताना राऊत म्हणाले की, दोन्ही मतदारसंघात चार ते पाच मंत्री ठाण मांडून बसले आहेत. प्रशासन आणि यंत्रणांवर हा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. पराभवाची भीती असली की लोकांना गोंधळ घालण्यास प्रवृत्त करायचं, असं राजकारण यामागे दिसून येत असून सकाळपासून काही गोष्ट स्पष्ट दिसत आहेत.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

Chinchwad Bypoll Election Result 2023: बिनविरोध निवडणुकीबाबत अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “विरोधकांनी फॉर्म…”!

सावरकरांना भारतरत्न द्या

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे असं वारंवार म्हटलं जातं. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा, अशी मागणी आम्ही आधीपासून करत आहोत. सावरकरांना भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की, त्यांच्या तोंडाला फेस येतो. वीर सावरकर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातले महान क्रांतिकारक होते. अंदमानमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ व्यक्त केला. सावरकर हे बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणास्थान होते. वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

पराभव दिसू लागल्याने अशांतता पसरविण्याचा प्रयत्न; खासदार श्रीरंग बारणे यांचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर आरोप

केंद्रातली महाशक्ती मराठीच्याबाबत हात आखडता का घेते?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी महाराष्ट्र खूप आधीपासून करत आहे. काल परवा शिंदे गटाने कार्यकारिणीत ठराव केला आहे की, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा. केंद्रातील त्यांचे महाशक्तीचे सरकार आहे. मग ही महाशक्ती मराठीच्या बाबतीत हात आखडता का घेत आहे? पाच ते सहा वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे, हे दुर्दैव असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.