आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी गंभीर आरोप केले असतानाच आता आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी नीलेश राणे यांना फटकारले आहे. ‘दर पाच वर्षांनी निवडणुकीत आनंद दिघे यांच्या मृत्यूचा विषय उकरुन काढला जातो आणि निवडणुकीनंतर विषय संपुष्टात येतो. नीलेश राणे यांनी हे गंभीर आरोप का केले हे मलाही माहित नाही, पण जर त्यांच्याकडे यासंदर्भातील काही पुरावे असतील तर ते जनतेसमोर आणावेत’, अशा शब्दात केदार दिघे यांनी नीलेश राणेंना सुनावले आहे.

नीलेश राणे यांच्या आरोपांवर केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. केदार दिघे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील संबंध जगजाहीर होते. फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्वच स्तरातील लोकांना दोघांमधील जिव्हाळ्याचे संबंध माहित होते. आनंद दिघे यांचा पुतण्या म्हणून मला इतकेच वाटते की नीलेश राणे यांच्याकडे आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भातील कोणतेही पुरावे असतील तर ते त्यांनी जनतेसमोर आणावे. अन्यथा निवडणुकीपूरता या विषयावर विधान करणे योग्य नाही, असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात काही पुरावे असतील आणि त्यात तथ्य असेल तर मी सत्याच्या बाजूने उभे राहण्यास तयार आहे. पण हे पुरावे जनतेच्या समोर आणले पाहिजे. नीलेश राणे मलादेखील संपर्क साधू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. आनंद दिघे यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदराचे स्थान आहे.या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कोणीही भावनांचा उद्रेक करु नये, असे आवाहनही त्यांनी केले. आनंद दिघे हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असल्याने त्यांच्याविषयी विधान करताना प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवावे, असे त्यांनी नमूद केले.

नीलेश राणे यांनी काय आरोप केले होते ?
‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आमच्या राणेसाहेबांचं आजही बाळासाहेबांवर प्रेम होतं मात्र ते ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही’, असे नीलेश राणे यांनी म्हटले होते. आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आले. हे दोन शिवसैनिकांना सहन झाले नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या आरोपानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

Story img Loader